Ganesh Puja 2023 Pune manache ganpati pratishthapana time ganesh utsav Latest updates Saam TV
मुंबई/पुणे

Ganesh Puja 2023: पुण्यातील मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना 'या' वेळेत होणार; जाणून घ्या सविस्तर माहिती

Ganesh Puja 2023 Marathi: पुण्यातील मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना किती वाजता होणार जाणून घेऊयात थोडक्यात...

Satish Daud

सचिन जाधव, साम टीव्ही

Ganesh Puja 2023 Marathi

गणेशोत्वस अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून उद्या सकाळी साडेदहा वाजेपासून विविध गणेश मंडळामध्ये गणरायाच्या प्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, पुण्यातील मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना कधी होणार जाणून घेऊयात थोडक्यात...  (Latest Marathi News)

मानाचा पहिला श्री कसबा गणपती

पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची प्रतिष्ठापना मंगळवारी डॉ. आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी महाराज यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी  होणार आहे. तत्पूवी सकाळी आठ वाजता उत्सव मंडपातून मिरवणुकीची सुरुवात होणार आहे.

मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती

मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्रतिष्ठापना (Ganeshotsav 2023) श्री समर्थ घराण्याचे अकरावे वंशज आणि सज्जनगड येथील भूषण महारुद्रा स्वामी महाराज यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी करण्यात येणार आहे. त्यापूर्वी उत्सव मंडपापासून मिरवणुकीला सुरूवात होणार असून केळकर रस्त्यावरील मूर्तीकार गुळुंजकर यांच्याकडून गणेश मूर्ती घेण्यात येईल.

मानाचा तिसरा गुरुजी तालीम

श्री गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त व उत्सवप्रमुख पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते दुपारी एक वाजून ४५ मिनिटांनी होणार आहे.तत्पूर्वी सकाळी साडेनऊ वाजता मिरवणूक उत्सव मंडपातून ढोल ताशा वाजवत मिरवणूक सुरू होईल.

मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती

यंदा उत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजे आज रात्री ८ वाजता गणेश मूर्ती उत्सव मंडपात आणली जाणार आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते नीलेश गायकवाड,ललित जैन,मनोज छाजेड यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश मूर्तीचे स्वागत केले जाईल.

तुळशीबागेतील श्रीराम मंदिरा पासून प्रभू श्रीरामचंद्राच्या पालखीतून उद्या सकाळी पूजेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनाची मिरवणूक निघणार आहे. दि पूना मर्चंट्स चेंबर्सचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया आणि जयराज अँन्ड कंपनीचे राजेश शहा यांच्या हस्ते उद्या सकाळी साडेअकरा वाजता गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे.

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती

केसरीवाडा गणेशोत्सव या मानाच्या पाचव्या गणपतीची प्रतिष्ठापना टिळक पंचांगानुसार १७ ऑगस्ट रोजी झाली आहे.त्यामुळे उद्या गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापनेची मिरवणूक निघणार नाही.पंचांगनुसार गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.    

अखिल मंडई मंडळ

अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची प्रतिष्ठापना ॲड. पराग एरंडे आणि अनुराधा एरंडे यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता करण्यात येणार आहे.अगोदर सकाळी ९ वाजता उत्सव मंडपातून मिरवणूक सुरू होणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी होणार आहे.प्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी साडेआठ वाजता मंदिरापासून आकर्षक फुलांनी सजविलेल्या हनुमान रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Padsare Waterfall : धबधब्यावर भिजायला आवडतं? मग 'पडसरे धबधबा' तुमच्यासाठी ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra Politics : भाजपला नवी मुंबईत खिंडार, ठाकरे गटाने दिला मोठा धक्का; VIDEO

नगरसेवकाचा लोगो, BMW गाडी आणि आत 32 कोटींचं MD ड्रग | VIDEO

Maharashtra Live News Update: ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: चिकन-मटण शॉपवर बंदी घालणं अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य; मग आदेश कोणी काढला?

SCROLL FOR NEXT