- सिद्धेश म्हात्रे
नवी मुंबई : ऐरोली एमआयडीसी (navi mumbai) येथील एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी भाजप आमदार गणेश नाईक (mla ganesh naik) यांनी आपल्या भाषणात आपणांस गुंडांचा बंदाेबस्त करण्यासाठी चाकू, बंदूकीची गरज नाही तर चुकीचे काम करणा-यांना व्यवस्थित करण्यासाठी मी फक्त ठरवावं लागत असे विधान केले आहे. नाईक (ganesh naik) नेहमीच दबंग पद्धतीची विधान करीत चुकीचे काम करणा-यांना पंगा घेऊ नका जणू असा इशाराच देत असतात. (ganesh naik latest marathi news)
आमदार गणेश नाईक म्हणाले गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी चाकु, तलवार आणि रिव्हॉल्व्हरची गरज नाही. मी ठरवलं तरी दुर्भाग्य काम करणारे चांगल्या रस्त्याला लागतात. आज पर्यंत ज्यांनी गणेश नाईकांचे मन दुखवलंय त्यांच्या चेहऱ्यावरील तेज निघून गेले आहे असेही त्यांनी नमूद केले.
पुढं बाेलताना नाईक म्हणाले मी काही शाप देत नसून माझ्या मनातील भाव व्यक्त करीत आहे. दरम्यान गरीबांवर हाेणारा अन्याय कदापी सहन करणार नाही असेही नाईक यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.