फरार आरोपी अखेर गजाआड, कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

फरार आरोपी अखेर गजाआड, कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

कल्याण शीळ रोडवरील गोदामाचे शटर उचकटून गोदामातील 8 लाख 43 हजाराची रक्कम असलेला लॉकर चोरट्यानी चोरून नेला होता. यातील 6 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.

प्रदीप भणगे

डोंबिवली : कल्याण शीळ रोडवरील गोदामाचे शटर उचकटून गोदामातील 8 लाख 43 हजाराची रक्कम असलेला लॉकर चोरट्यानी चोरून नेला होता. यातील 6 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. यातील मुख्य फरार आरोपी आकाश उर्फ बटल्या सिंग (वय 21) याला अडीच वर्षानंतर अटक करण्यात कल्याण गुन्हे अन्वेषन विभागाला यश आले आहे. आकाश याच्यावर आधीही बदलापूर आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकूण 6 गुन्हे दाखल आहेत.  

हे देखील पहा -

कल्याण शिळफाटा रोडवरील डी. एस. ऐजन्सी हे गोदाम नोव्हेंबर 2018 मध्ये काही चोरट्यानी फोडले होते. या गोदामातील लॉकरच चोरट्यानी पळवून नेला होता. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी जानेवारी 2019 मध्ये चोरीच्या गुन्ह्यातील 6 आरोपींना अटक करत त्यांच्याकडून 5 लाख 45 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला होता. यातील मुख्य आरोपी आकाश हा मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देत होता.

कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडे याचा तपास जाताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले यांच्या पथकाने गुप्त बतमीदारांमार्फत आकाशचा ठिकाणा शोधून काढला. बदलापूर येथेच आकाश असल्याचे समजताच सापळा रचुन बुधवारी 25 ऑगस्टला ताब्यात घेतले.

आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.आकाश हा सराईत गुन्हेगार असून तपासात त्याच्यावर बदलापूर पोलीस ठाणे व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी 3 असे 6 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT