FREE FIRE ID DISPUTE IN KALINA saam tv
मुंबई/पुणे

फ्री फायरच्या आयडीवरून वाद अन् थेट गळ्यावर चाकू; घटनेने खळबळ

Free Fire ID dispute youth knife Attack In Kalina Mumbai: फ्री फायर गेमच्या आयडीवरून झालेल्या वादातून कलिना परिसरात तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

ऑनलाइन फ्री फायर गेमच्या आयडीवरून झालेल्या वादातून एका तरुणाच्या गळ्यावर चाकूने गंभीर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सांताक्रुझ पूर्वेकडील कलिना परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, अन्य एका व्यक्तीविरोधातही तक्रार नोंदवण्यात आली आहे. सलमान फारुक शाह यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १.३० वाजता त्यांचा भाऊ दिलशाद शाह आणि त्यांचे मित्र सेंट रॉक चर्च, कुंची कुरवे नगर, कलिना परिसरातील पायऱ्यांवर बसले होते. दरम्यान, सलमान हे जेवणासाठी कुर्ला पश्चिम येथील किस्मत नगरमधील घरी गेले होते.

याच काळात सलमान यांच्या ओळखीचा अरबेज शाह याने त्यांना फोन करून शिवीगाळ केली आणि वाद घातला. ऑनलाइन फ्री फायर गेमच्या आयडीवरून हा वाद सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी सलमान यांनी त्यांचा भाऊ दिलशाद याचा मोबाईल क्रमांक दिला होता. काही वेळाने दिलशाद याच्याबाबत माहिती घेण्यासाठी फोन केला असता, मित्र समीर याने फोन उचलला. त्यावेळी अरबेजने दिलशादच्या गळ्यावर चाकूने वार केल्याचे त्याने सांगितले. ही माहिती मिळताच सलमान कलिनाच्या दिशेने रवाना झाले.

रस्त्यात त्यांना एक रुग्णवाहिका दिसली. त्यामध्ये दिलशाद आणि त्यांचे मित्र परवेज व अरबाज असल्याचे त्यांना दिसले. दिलशादच्या गळ्यावर गंभीर जखमा होऊन रक्तस्राव होत असल्याचे सलमान यांच्या निदर्शनास आले. परवेज आणि अरबाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबेजने दिलशादच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी सलमान फारुक शाह यांच्या तक्रारीवरून अरबेज शाह, मुसाहिद वकील अहमद खान, कौसर अली जमील शाह आणि अनस सय्यद यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११८(१), ३५१(३), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात मुसाहिद वकील अहमद खान, अरबेज शाह आणि कौसर अली जमील शाह या तिघांना अटक करण्यात आली आहे. ऑनलाइन गेमच्या आयडीवरून सुरू झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips For Women: ब्लाऊजशिवाय साडी नेसण्याच्या मॉडर्न स्टाईल; 5 हटके आणि स्टायलिश पॅटर्न्स

मला प्रचंड त्रास दिला जातोय, आता संयमाचा बांध तुटणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Maharashtra News Live Update: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसान पाहणी

रशियाचा युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर हल्ला; 400 कोटी रुपयांचं नुकसान

Maharashtra Fort : घनदाट जंगलात ३२०० फूट उंचीवर वसलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला, ट्रेकिंगसाठी नक्की जा

SCROLL FOR NEXT