lawrence bishnoi  Saam tv
मुंबई/पुणे

लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने २० लाखांची खंडणी; व्यावसायिकांमध्ये खळबळ, कारवाईत टोळीचं पुणे कनेक्शन उघड

lawrence bishnoi news : लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने व्यापाऱ्याकडे २० लाखांची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणानंतर व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

ज्वेलर्स व्यावसायिकाकडून २० लाखांची खंडणी मागण्यात आली.

टोळीकडून स्वतःला बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचे सांगितले

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत केली चौघांना अटक

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील एका ज्वेलर्स व्यावसायिकाला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचे सांगत २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चौघांना विलेपार्ले पोलिसांनी अटक केली आहे. दिपक नरेंद्र डांगोल, माजिद साजिद खान, फैजान फिरोज खान आणि साहिल इलियास शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत. टोळीतील सदस्य ते मुंबई व पुणे परिसरातील रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्वेलर्स व्यावसायिक १२ फेब्रुवारी रोजी घरी असताना त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. संबंधित व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचे सांगत २० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सुरुवातीला व्यावसायिकाने या कॉलकडे दुर्लक्ष केले; मात्र त्यानंतर वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून वारंवार धमकीचे फोन येऊ लागले.

धमक्यांमुळे घाबरलेल्या व्यावसायिकाने विलेपार्ले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत सापळा रचला. तक्रारदाराने आरोपींना पैसे देण्याची तयारी दर्शवून ठरावीक ठिकाणी बोलावले. ठरल्याप्रमाणे आरोपी खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी आले असता आधीपासून पाळत ठेवून बसलेल्या पोलिसांनी त्यांना रंगेहात अटक केली.

तपासादरम्यान आरोपींनी लॉरेन्स बिश्नोईचे नाव पुढे करून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या घटनांमुळे निर्माण झालेल्या दहशतीचा फायदा घेत त्यांनी हा कट रचल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अटक आरोपींपैकी काही जण लहान-मोठी कामे करत असून त्यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास सुरू आहे.

चौघांना अंधेरी येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात आणखी काही साथीदारांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. पुढील तपास विलेपार्ले पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराजांचा आत्महत्येचा प्रयत्न; स्वत:वरच केले वार

Cabbage Thalipeeth Recipe: सकाळी नाश्त्याला बनवा गरमागरम कोबीचे खुसखुशीत थालीपीठ, सोपी आहे रेसिपी

Rain Alert : महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार, ९ जिल्ह्यांना अलर्ट, वाचा पाऊस कुठे धो धो कोसळणार?

Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ₹३०००; या दिवशी जमा होणार पैसे

Maharashtra Live News Update : रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आज निवड

SCROLL FOR NEXT