Vanraj Andekar Saam Tv
मुंबई/पुणे

Vanraj Andekar Case : धक्कादायक! लाडक्या नव्हे मारक्या बहिणी; माजी नगरसेवकाला सुपारी देऊन संपवलं, हत्येचा CCTV आला समोर, VIDEO

Vanraj Andekar Case update : पुण्यात लाडक्या बहिणी मारक्या निघाल्या आहेत. पुण्यातील बहिणींनी माजी नगरसेवकाला सुपारी देऊन संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हत्येचा CCTV आला समोर आला आहे.

Tanmay Tillu

पुणे : पुण्याच्या मध्यभाग असलेल्या आणि नेहमी वर्दळीचं ठिकाण असलेल्या नाना पेठेत रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची हत्या करण्यात आली. वनराज आंदेकर असं मृत माजी नगरसेवकाचं नाव आहे. या हत्येचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

कोयते, बंदुका घेऊन 14 ते 15 जणांची गँग पुण्यातील नाना पेठेत येते. रात्री साडेआठ वाजता वनराज आंदेकर नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्या वेळी त्यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या..गोळ्या घातल्या तरी जिवंत राहू नये म्हणून पुन्हा कोयत्यानं वार करण्यात आले. आंदेकर या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आंदेकर यांच्या मेहुण्याने त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केल्याचे उघड झाले आहे. या घटनेनंतर नाना पेठेत खळबळ उडाली आहे.

लाडकी बहीणचं भावाच्या जीवावर उठलीय. प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या करण्यात आली. वनराज यांच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, त्यांच्याच दोन मुलींनी आणि 2 मेव्हण्याच्या सांगण्यावरून हे कृत्य करण्यात आलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपी निष्पन्न झाले आहे. या हत्येप्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. शरद मोहोळच्या खूनानंतर पुणे शहरातील ही दुसरी घटना आहे. या प्रकरणी विरोधकांनी सरकारला घेरलंय.

कधी ड्रग्ज,कधी कोयता गँग तर कधी हिट अँड रन प्रकरणी पुणे चर्चेत येतं. गेल्या काही दिवसांत पुण्यातील क्राईम रेकॉर्ड नवनवे उच्चांक गाठतंय. ही शरमेची बाब आहे. अस्ताव्यस्त फोफावलेल्या पुण्यात गुन्हा घडला नाही असा एकही दिवस जात नाही. त्यामुळे सुसंस्कृत,विद्येचं माहेर वगैरे बिरुदावल्या मिरवण्याचा मान पुण्यानं गमावलाय. पुण्याच्या सुरक्षेला वाली कोण? असा सवाल या घटनांमुळे उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT