Maharashtra Congress Saam Tv
मुंबई/पुणे

विधान परिषदेच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये नाराजी; 'या' माजी मंत्र्याने व्यक्त केली नाराजी

विधान परिषदेच्या दोन जागांसाठी काँग्रेसने दोन उमेदवारांची नावे जाहीर केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) विधान परिषदेच्या सहा जागा लढवणार आहे. प्रत्येक पक्षाला दोन जागा मिळणार आहेत. आज शिवसेनेकडून (Shivsena) दोन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. आज काँग्रेसकडूनही दोन नावे जाहीर करण्यात आली. काँग्रेसने चंद्रकांत हांडोरे आणि काँग्रेस नेते भाई जगताप यांना उमेदवारी दिली. यावरुन आता काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे. माजी मंत्री नसीम खान यांनी आज महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेसने (Congress) चंद्रकांत हांडोरे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. हांडोरे यांनी पक्षासाठी काय केल असा सवाल व्यक्त करत नसीम खान यांनी एच के पाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभेची उमेदवारी बाहेरच्या राज्यातील व्यक्तीला देण्यात आली. विधान परिषदेलाही संधी नसल्यामुळे नसीम खान संतप्त झाले आहेत.

काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी यादी जाहीर

काँग्रेसने (Congress) विधान परिषदेसाठी चंद्रकांत हांडोरे आणि काँग्रेस नेते भाई जगताप यांना उमेदवारी दिली आहे. काल महाविकास आघाडीच्या आमदारांची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या (Mahavikas aghadi) नेत्यांनी विधान परिषदेसाठी बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडी सहा जागा लढवणार असल्याचा निर्ण झाला. प्रत्येक पक्षाला दोन दोन जागा देण्यात आल्या आहेत.

विधान परिषदेसाठी आज महाविकास आघाडीतील काँग्रेस (Congress), शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही यादी जाहीर केली आहे. शिवसेनेकजून सचिन अहिर, हमशा पाडवी, तर काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे आणि काँग्रेस नेते भाई जगताप यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपकजूनही दोन नावे जाहीर केली आहेत. यात प्रविण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महाविकास आघाडीची ती खेळी यशस्वी

राज्यसभा निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये आज महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जुन खर्गे, नाना पटोले उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करुन, आपण राज्यसभेची जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला. विशेष म्हणजे या बैठकीला अपक्ष आमदारांचीही उपस्थिती होती.

२९ अपक्ष आमदारांपैकी १३ आमदारांनी आज महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थिती लावली आहे. तर एमआयएम आणि बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टीच्या आमदारांनी बैठकीला दांडी मारली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : हिवरखेडच्या आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात? आमदार मिटकरींच्या आरोपानंतर चौकशी समिती गठित

रॉकस्टार सूनबाई! डोक्यावर पदर हाती गिटार, व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील नवरी आहे तरी कोण?

Lonavala Places : फ्रेंड्ससोबत फिरायला जाताय? मग या ठिकाणी नक्कीच जा

मृत्यूपूर्वी Whatsapp स्टेट्स ठेवलं, पोलीस हवालदाराचा मृत्यू; पोलीस दलात शोककळा

Shocking : अहिल्यानगर हादरलं! पुलाखाली आढळला ४ महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह; नेमका काय प्रकार?

SCROLL FOR NEXT