kishori pednekar and ramdas kadam  saam tv
मुंबई/पुणे

'रामदासभाई, तुमचा पगार किती आणि बोलता किती?' किशोरी पेडणेकरांनी करून दिली फडणवीसांच्या टीकेची आठवण

रामदास कदम यांच्या टीकेला शिवसेना नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर (kishori Pednekar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

kishori Pednekar News : शिवसेना आणि शिंदे गटाचा संघर्ष चांगलाच पेटला आहे. शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडूनही कोकणात शिव संवाद यात्रेत शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यानंतर शिंदे गटाचे रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रामदास कदम यांच्या टीकेला शिवसेना नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर (kishori Pednekar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच पेडणेकरांनी 'रामदास भाई तुमचा पगार किती आणि बोलता किती?' या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जुन्या टीकेची आठवण करून दिली .

रामदास कदम यांच्याकडून शिवसेनेला जोरदार लक्ष्य केलं जात आहे. त्यांच्या टीकेला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर देत आहे. 'रामदास कदम यांनी पातळी सोडली हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय. यापूर्वी नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस हे रामदास कदम यांच्याबद्दल काय म्हणालेत त्याबद्दल ऐका. त्यानंतर त्यांच्या वर्तमानकाळ सांगेन.

'भूतकाळापासून पक्ष फोडण्याची यांच्या मनात दुही माजली होती. राणे म्हणाले होते की, 'रामदास यांनी मला तोंडावर पाडलं. विरोधी पक्षनेते पद आणि त्याची गाडी मिळाल्यानंतर त्याठिकाणी जाऊन बसले'. फडणवीस म्हणाले होते की, 'रामदास भाई तुमचा पगार किती आणि बोलता किती ? यापूर्वी दोनदा शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जाणार होता', असे त्या म्हणाल्या.

किशोरी पेडणेकर पुढे म्हणल्या, 'रामदास कदम आता १२ आमदारांच्या यादीत स्थान मिळावं म्हणून लाळघोटेपण करणारा हा नेता आहे. बाळासाहेब जेव्हा ऐकायचे नाही,तेव्हा वहिनींकडे जाऊन मस्का मारायचा. रामदास कदम हे भाई म्हणण्याच्या पण लायकीचा नाही. बरं झालं घाण गेली. आमच्या महिलांच्या नजरेतून ते उतरले. त्यांनी राक्षसी वृत्ती दाखवली'.

'तुम्ही स्वत:च्या मुलाला आमदार केलं. तुम्ही स्वत:च्या बापाचं नाव लावता. आता आम्ही तुमच्या आईला विचारायला जायचं का हे कसं ? तुम्हाला नाही पटलं तर जिथे जायचं, तिथे जा. पण आपले घाण संस्कार दाखवू नका. आदित्यने लग्न करायचं की नाही हे त्याचे आई-वडील बघून घेतील. तुम्ही त्यावर भाष्य करणारे कोण ?', असा सवाल करत किशोर पेडणेकर यांनी रामदास कदम यांच्यावर सडकून टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

SCROLL FOR NEXT