मुंबई/पुणे

Maharashta Politics : काँग्रेसला मोठा धक्का; रवींद्र धंगेकर शिंदे गटात प्रवेश करणार? VIDEO

Maharashta Political News : ठाकरे गटासह काँग्रेसला लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर आणि काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

पुणे : पुण्यातील राजकीय वर्तुळातून मोठी बातमी हाती आली आहे. पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रवींद्र धंगेकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मागील विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं.

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची मुंबईत गुप्त भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धंगेकर यांनी मनसेमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी पुण्यातील कसबा मतदारसंघ बांधला. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत कसब्यात धंगेकर यांनी भाजपला पराभवाची धूळ चारली. मात्र, दीड वर्षानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. भाजपच्या हेमंत रासने यांनी रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर धंगेकर पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे.

पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का

पुण्यात काँग्रेसनंतर ठाकरे गटालाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर हे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महादेव बाबर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती हाती आली आहे.

महादेव बाबर यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महादेव बाबर यांच्यासोबत शहरातील आणखी काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे बाबर नाराज होते.

मुंबईत आठवले गटाला धक्का

मुंबईत शिंदे गटाने आठवले गटालाही धक्का दिला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सचिव सुमित वजाळे यांच्यासह शेकडो आरपीआय आणि विविध पक्षाच्या कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या शेकडे कार्यकर्त्यांचा चुनाभट्टीत शिंदे गटात प्रवेश होत आहे. या पक्ष प्रवेशासाठी मंत्री भरत गोगावले उपस्थित झाले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT