Ranjit savarkar  saam tv
मुंबई/पुणे

Video : गांधींच्या हत्येसाठी माजी काँग्रेस मंत्र्यांच्या मेव्हण्याने पिस्तुल पुरवले; रणजित सावरकर यांचा खळबळजनक आरोप

गांधींच्या हत्येसाठी तत्कालीन काँग्रेस मंत्र्यांच्या मेव्हण्याने पिस्तुल पुरवले, असा आरोप देखील रणजित सावरकर यांनी केला.

साम टिव्ही ब्युरो

भूषण शिंदे

Ranjeet savarkar News : नथुराम गोडसे यांना गांधी हत्येसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पिस्तूल हे ग्वाल्हेर येथून पुरवले होते असा खळबळजनक आरोप महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केला. त्यावरून देशातील राजकारण तापलं असताना त्याला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी तुषार गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. गांधींच्या हत्येसाठी तत्कालीन काँग्रेस मंत्र्यांच्या मेव्हण्याने पिस्तुल पुरवले, असा आरोप देखील रणजित सावरकर यांनी केला. (Latest Marathi News)

रणजित सावरकर म्हणाले, 'गांधी हत्येच्या खटल्यात ग्वाल्हेरचे डॉ.परचुरे यांच्यावर असा आरोप ठेवण्यात आला होता की त्यांनी हे पिस्तुल नथुराम गोडसेला दिले. ते पिस्तुल परचुरे यांनी जगदीश गोयल यांच्याकडून विकत घेतलं'.

'याच संदर्भात त्यांचे वकील पु.ल.इनामदार लिखित 'लाल किल्ल्यातील अभियोगाची कहाणी' या पुस्तकातील संदर्भानुसार जगदीश गोयल यांनी ते पिस्तूल नाथिलाल जैन याकडून घेतलं आणि या दोघांना देखील त्या एप्रिल महिन्यात अटक केली आणि या दोघांनीही आपली साक्ष द्यायला आणलेच नाही. त्यात नाथूलाल जैन सोबत ग्वाल्हेरच्या गृहमंत्र्यांचे नाव देखील होते. हा नाथिलाल जैन एका काँग्रेसी (Congress) मंत्र्यांचा मेव्हणा होता, असा आरोप सावरकर यांनी केला आहे.

'या पिस्तुलाचे धागेदोरे जेव्हा काँग्रेस पर्यंत गेले, तेव्हा या नाथूलाल जैनची साक्ष न घेता हे पिस्तूल कुठून आलं आणि कसे आले याची चौकशी न करता हे प्रकरण गुलदस्त्यात ठेवले, असे सावरकर म्हणाले.

'पु.ल.इनामदार असं सांगतात की पिस्तुल जर कोणी पुरवले असेल, तर एका काँग्रेसच्या मंत्र्याच्या मेव्हण्याने पिस्तुल पुरवले. आणि ते पिस्तुल त्याच्याकडे कुठून आलं याचा जाब जर विचारायचा असेल तर तेव्हा काँग्रेसचे शासन होते. तेव्हा हा जाब तुषार गांधी यांनी निश्चित राहुल गांधी याना विचारावा, असे सावरकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT