Ganpat Gaikwad Saam Tv
मुंबई/पुणे

Ganpat Gaikwad: गणपत गायकवाड यांना मोठा झटका, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

Kalyan Court: भाजप माजी आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याणच्या द्वारली येथील एका जागेच्या वादातून हिललाईन पोलिस ठाण्यात माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता.

Priya More

अभिजीत देशमुख, कल्याण

कल्याण-भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांचा जामीन अर्ज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्याकडे या संदर्भात पार पडलेल्या सुनावणीनंतर जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. आता माजी आमदार गायकवाड यांच्या वकिलांच्या मार्फत जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला जाऊ शकतो.

कल्याणचे भाजप माजी आमदार गणपत गायकवाड यांनी द्वारली येथील एका जागेच्या वादातून हिललाईन पोलिस ठाण्यात माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. ही घटना २ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली होती. या घटनेनंतर माजी आमदार गायकवाड यांना अटक झाली होती. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. सध्या माजी आमदार तळोजा जेलमध्ये आहेत.

माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या वकिलामार्फत कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाकडे जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. गोळीबाराच्या घटनेचे प्रथमदर्शी पुरावे मिळून आले आहेत. माजी आमदार गायकवाड हे जामीनावर सुटून आल्यावर या घटनेतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराना पुरावा देण्यापासून परावृत्त करु शकतात. हे मुद्दे प्रतिपक्षाच्या वकिलांनी उपस्थित केले. या मुद्याच्या आधारे जिल्हा सत्र न्यायाधीश वाघमारे यांनी दोन्ही पक्षाचे म्हणणे एकून घेत माजी आमदार गायकवाड यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT