Former BJP MLA Ganpat Gaikwad Saam
मुंबई/पुणे

कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरण; भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाडांना दिलासा, कोर्टाकडून निर्दोष मुक्तता

Former BJP MLA Ganpat Gaikwad: कल्याण कोर्टाने गणपत गायकवाड, निलेश शिंदेसह पाच जणांना निर्दोष मुक्तता दिली. त्यांच्यावर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकांच्या केबिनमध्ये राडा केल्याचा आरोप होता.

Bhagyashree Kamble

  • २०१४ साली कोळसेवाडी पोलीस ठाण्यात झालेल्या राड्याच्या प्रकरणी सुनावणी.

  • कल्याण कोर्टाने माजी आमदार गणपत गायकवाड आणि निलेश शिंदेसह पाच जणांना निर्दोष मुक्तता दिली.

  • पुराव्यांअभावी आरोपींना न्यायालयीन दिलासा मिळाला.

  • सध्या गणपत गायकवाड व कुणाल पाटील उल्हासनगर गोळीबार प्रकरणात तुरुंगात आहेत.

२०१४ मध्ये कोळसेवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये झालेल्या राड्याच्या प्रकरणात भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात कल्याण न्यायालयानं सुनावणी करताना गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख निलेश शिंदे यांच्यासह पाच जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.

मात्र, गणपत गायकवाड आणि कुणाल पाटील हे सध्या उल्हासनगरात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी कारागृहात आहेत.

२०१४ साली कोळसेवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. माजी आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना पदाधिकारी निलेश शिंदे यांच्यासह पाच जणांवर राडा घातल्याचा आरोप होता. त्यावेळी गणपत गायकवाड हे अपक्ष आमदार होते, तर निलेश शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते.

पोलिसांनी या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी स्वत: गुन्हा नोंदवून आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र, पुराव्यांअभावी कल्याण कोर्टानं गणपत गायकवाड, निलेश शिंदेसह पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

सध्या गणपत गायकवाड आणि कुणाल पाटील हे उल्हासनगरमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणात अटकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: मुंबई, पुणे अन् हैदराबादचा प्रवास होणार फक्त दीड तासांत; बुलेट ट्रेननं नाशिकच्या वाइन, कृषी उद्योगाला मिळेल चालना

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट

Deool Band 2 Collection : स्वामींची भक्ती अपरंपार! वीकेंडला 'देऊळ बंद 2' हाऊसफुल, बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंचा डंका; छप्परफाड कमाईचा आकडा किती?

PM Kisan Yojana: मे महिना संपला तरी 23 वा हप्ता नाही; शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 कधी येणार? तारीख कधी येणार समोर?

Solapur : क्रिकेटच्या मैदानात भयंकर घडलं, रोलर ओढत असताना १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT