Harbour Line Mega Block saam tv
मुंबई/पुणे

Mega Block News: रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! हार्बर मार्गावर आजपासून पाच दिवस मेगाब्लॉक, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

Harbour Line Mega Block: रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! हार्बर मार्गावर आजपासून पाच दिवस मेगाब्लॉक, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

Satish Kengar

Harbour Line Mega Block:

हार्बर मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी अप आणि डाउन 2 नवीन लाईन्सच्या बांधकामासाठी उपनगरीय यार्ड रीमॉडेलिंग कामासाठी पनवेल येथे ३८ तासांचा ब्लॉक संपल्यानंतर आणखी पाच दिवसांचा वाहतूक ब्लॉक घेणार आहे.

हा ब्लॉक पाच दिवस फक्त मध्यरात्री घेण्यात येणार आहे. दोन तारखेपासून म्हणजेच सोमवार ते शुक्रवारपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. यामुळे लोकल ट्रेनच्या वाहतुकीतहे बदल करण्यात आला आहे. यासाठी रेल्वेने नवीन वेळापत्रकही जाहीर केलं आहे.

ब्लॉक कालावधीत २ ते ६ रात्री ०.३० ते ५.३० तास या ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा रद्द राहतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  (Latest Marathi News)

वेळापत्रक

• 02.10.2023 ते 06.10.2023 पर्यंत डाऊन हार्बर मार्गावर पनवेलसाठी शेवटची लोकल ट्रेन 22.58 वाजता CSMT सुटेल आणि 00.18 वाजता पनवेलला पोहोचेल.

• 02.10.2023 ते 06.10.2023 पर्यंत डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ठाणे 23.32 वाजता सुटेल आणि 00.24 वाजता पनवेलला पोहोचेल.

• अप हार्बर मार्गावर पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल ब्लॉक कालावधीत वेळापत्रकानुसार असेल.

• 02.10.2023 ते 06.10.2023 पर्यंत अप ट्रान्स-हार्बर मार्गावर पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल 22.15 वाजता पनवेलहून सुटेल आणि 23.07 वाजता ठाण्याला पोहोचेल.

• ब्लॉकनंतर पहिली लोकल ट्रेन सीएसएमटीहून पनवेलसाठी ब्लॉक कालावधीत वेळापत्रकानुसार असेल.

• 03.10.2023 ते 07.10.2023 पर्यंत ठाण्याहून पनवेलसाठी ब्लॉक केल्यानंतर पहिली लोकल ट्रेन 06.20 वाजता ठाण्याहून सुटेल आणि 07.12 वाजता पनवेलला पोहोचेल.

• 03.10.2023 ते 07.10.2023 पर्यंत पनवेलहून अप हार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल ट्रेन 03.10.2023 ते 07.10.2023 पर्यंत पनवेलहून 05.40 वाजता सुटेल आणि 06.59 वाजता CSMT ला पोहोचेल.

• ब्लॉकनंतर पनवेलहून अप ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाण्याच्या दिशेने 03.10.2023 ते 07.10.2023 पर्यंत पहिली लोकल ट्रेन 06.13 वाजता पनवेलहून सुटेल आणि 07.05 वाजता ठाण्याला पोहोचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT