MPSC चा भोंगळ कारभार; इतिहासात पहिल्यांदाच तीन वेळा प्रसिद्ध केली उत्तरसुची SaamTv
मुंबई/पुणे

MPSC चा भोंगळ कारभार; इतिहासात पहिल्यांदाच तीन वेळा प्रसिद्ध केली उत्तरसुची

काही चुक नसताना MPSC च्या चुकीमुळे विद्यार्थी नापास झाले आहेत असा आरोप विद्यार्थी करत आहेत.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे यावर्षी सप्टेंबरमध्ये PSI आणि STI ची परीक्षा झाली, परीक्षेनंतर MPSC ने दोन वेळा जाहीर केलेल्या उत्तरसूचीमध्ये ही चुका आढळल्याने MPSC ला पहिल्यांदाच तिसरी उत्तरसूची सुध्दा प्रसिद्ध करावी लागली. मात्र तिसऱ्यांदा ही उत्तरसूचीमध्ये काही आयोगाने चुकीची उत्तरे प्रसिद्ध केलेली आहेत, तसेच काही प्रश्न रद्द केल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांवर त्याचा परिणाम झाला आहे. काही चुक नसताना MPSC च्या चुकीमुळे विद्यार्थी नापास  झाले आहेत  असा आरोप विद्यार्थी करत आहेत.

दरम्यान स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी भविष्याच्या चिंतेने नैराश्याच्या गर्तेत अडकल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. MPSC ची तयारी करणाऱ्या स्वप्नील लोणकर या दौंड तालुक्यातील केडगाव मधील विद्यार्थ्याने जुलै २०२१ मध्ये नैराश्यातून आत्महत्या केली होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती दौंड तालुक्यात झाली असून मल्हारी बारवकर, (रा. देऊळगाव गाडा, ता.दौंड, जि.पुणे) या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी मल्हारी बारवकर याने लिहलेल्या चिठ्ठीत त्याच्या घरच्यांसाठी नमूद केले आहे कि, "मी तुम्हाला दाखवलेली स्वप्ने पूर्ण करु शकत नाही आणि तुमचे पडलेले चेहरेही पाहू शकत नाही. या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही. अतिविचार, संपलेला आत्मविश्वास, भविष्यातही काही सकारात्मक चित्र दिसत नाही. चांगलं जगण्याच्या सगळ्या आशा संपलेल्या आहेत."

काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मल्हारी याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्यातून ही आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाटस पोलीस करत आहेत. मात्र, स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याचे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच दौंड तालुक्यातीलच असणाऱ्या व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे, आणि त्यात MPSC चा अजूनही भोंगळ कारभार सुरु आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट रद्द

Couple Viral Video : पुण्यात धावत्या दुचाकीवर अश्लील चाळे, मुलगी पेट्रोल टाकीवर बसली अन्.... प्रेमीयुगुलांचे प्रेम उतू

Nysa Devgan : अजय देवगन-काजोलची लाडकी लेक झाली ग्रॅज्युएट, नीसाच्या पदवी प्रदान समारंभाचा VIDEO समोर

Pali Crime News : रायगडच्या पालीमध्ये सशस्त्र दरोडा; रात्रीच्या अंधारात पाच घरांमध्ये घातला धुमाकूळ

Mumbai - Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचं काम अपूर्ण; टोल नाके मात्र पूर्ण, शरद पवार गट आक्रमक | VIDEO

SCROLL FOR NEXT