Bandra Terminus - Madgaon Express Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai to Goa Trains: बाप्पा पावला अन् मुंबई-गोवा ट्रेन धावली! वांद्रे ते मडगाव आठवड्यातून दोन वेळा धावणार रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Bandra Terminus - Madgaon Express: ऐन गणेशोत्सव सुरू होण्याआधी मुंबई ते गोवा नवीन ट्रेन धावणार आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल गुरुवारी दुपारी वांद्रे टर्मिनस ते मडगाव दरम्यानच्या द्वि-साप्ताहिक ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे.

Satish Kengar

कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऐन गणेशोत्सव सुरू होण्याआधी मुंबई ते गोवा नवीन ट्रेन धावणार आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल गुरुवारी दुपारी वांद्रे टर्मिनस ते मडगाव दरम्यानच्या द्वि-साप्ताहिक ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ही रेल्वे गोव्यातील मडगाव येथून दर मंगळवार आणि गुरुवारी सकाळी 7.40 वाजता सुटेल आणि रात्री 11.40 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. तसेच ती वांद्रे टर्मिनस येथून दर बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 6.50 वाजता सुटेल आणि रात्री 10 वाजता मडगावला पोहोचेल.

या स्थानकांवर

ही रेल्वे बोरिवली, वसई, भिवंडी, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिविम आणि करमाळी या रेल्वे स्थानकांवर थांबेल.

20 डब्यांच्या या रेल्वेमध्ये डब्यांच्या वेगवेगळ्या श्रेणी असतील: एसी 2-टायर, एसी 3-टायर, एसी 3-टायर इकॉनॉमी क्लास, स्लीपर क्लास आणि सामान्य सेकंड क्लास.

दरम्यान, राज्यातील128 रेल्वे स्थानके अमृत स्थानके म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. पश्चिम उपनगरवासीयांना कोकणात जाणे सुलभ व्हावे यासाठी मडगाव एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे, असं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गाचे काम आद्यपही अपूर्णच

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT