Thane news  Saam TV
मुंबई/पुणे

Thane News : ठाणेकरांनो सावधान! ठाण्यात H3N2चा पहिला मृत्यू ; रुग्णांचा आकडा १९ वर

H3N2 Update: बुधवारी मृत्यू झालेल्या वृद्धाला कोरोना आणि ‘एच ३ एन २’ अशा दोन्ही प्रकारच्या आजारांची लागण झाल्याचे समोर आले आहे.

विलास काटे

ठाणे: एकीकडे ठाणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे आता ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. तो आकडा आता १९ झाला आहे. त्यातच बुधवारी मृत्यू झालेल्या वृद्धाला कोरोना आणि ‘एच ३ एन २’ अशा दोन्ही प्रकारच्या आजारांची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर ‘एच ३ एन २’ चा ठाण्यातील तो पहिला बळी म्हणून नोंदवला गेला आहे.

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असताना मात्र ठाणे महापालिका हद्दीतही रुग्णांसह उपचारादरम्यान मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडा आठवड्यात तीन झाला आहे. ते तिघे ७० वर्षांवरील असून त्यांना सहव्याधी होते. त्यातच बुधवारी मृत्यू झालेल्या वृद्धाला खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचीही लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालातून उघड झाले होते.

H3N2 व्हायरस म्हणजे काय?

आजकाल सर्वात जास्त H3N2 विषाणू (Virus) अडचणीचे कारण बनले आहे. हा विषाणूजन्य वंशातील इन्फ्लुएंझा विषाणू A चा उपप्रकार आहे, जो मानवी इन्फ्लूएंझाचे प्रमुख कारण आहे.

H3N2 चा सर्वाधिक धोका कोणाला आहे?

  • दमा असलेले रुग्ण

  • मधुमेह असलेले रुग्ण

  • हृदयरोग असलेले रुग्ण

  • कमकुवत रोगप्रतिकार प्रणाली असलेले लोक

  • न्यूरोलॉजिकल किंवा न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर

  • पाच वर्षाखालील मुले

H3N2 लक्षणे

  • ताप

  • खोकला

  • घसा खवखवणे

  • वाहणारे किंवा भरलेले नाक

  • शरीर वेदना

  • डोकेदुखी

  • थकवा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datta Jayanti Puja Vidhi: श्री दत्त जंयत्ती पूजा कशी करावी? कोणत्या मंत्राचा जप करावा?

Akola : ऑपरेशन थिएटरमध्ये मांसाचे गोळे; आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात, अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

Mumbai Car Boat: मुंबईच्या समुद्रात चक्क धावतेय Rolls Royce, व्हिडिओ झाला व्हायरल, वाचा

Nagpur: लग्नावरून परतताना काळाचा घाला, भरधाव ट्रकने तिघांना चिरडलं; सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू

Zodiac signs: आजचा दिवस शुभ की आव्हानात्मक? या ४ राशींना मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT