Uddhav Thackeray Criticizes BJP and Kiren Rijiju 
मुंबई/पुणे

Waqf Amendment Bill : गोमांस खाणाऱ्या रिझिजू यांनी विधेयक मांडले, वफ्क विधेयकावरून ठाकरे संतापले

uddhav thackeray on Waqf Amendment Bill : उद्धव ठाकरे यांनी वफ्क सुधारणा विधेयकावरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलेय. एकेकाळी गोमांस खाणाऱ्या किरेन रिझिजू यांनी विधेयक मांडल्याचं ठाकरे म्हणाले.

Namdeo Kumbhar

Waqf Bill Controversy: गोमांस खाणाऱ्या रिझिजू यांनी वफ्क सुधारणा विधेयक मांडले, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. ते मुंबईत बोलत होते. पत्रकार परिषद घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वफ्क सुधारणा विधेयकावरून आपले मत मांडले. त्यांनी भाजपावर निशाणा (Uddhav Thackeray Criticizes BJP and Kiren Rijiju) साधलाय. ईदची मेजवानी झोडून, ढेकर देऊन वफ्क बोर्डाचे विधेयक मांडले. योगायोग म्हणजे, किरेन रिझिजू यांनी हे बिल मांडले. एकाकेडी किरेन यांनी गोमांस खाण्याचे समर्थन केले होते. त्यांनीच वफ्क बोर्डाच्या सुधारणेचे विधेयक मांडले. हा ठरवून आणलेला योगायोग आहे की फक्त योगायोग आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आज मुस्लिमांच्या जमिनीवर डोळा आहे. उद्या हिंदूच्या जमिनीवरही डोळा ठेवाल. भाजपने त्यांची जुमलेबाजी आता बंद करावी, असा टोला ठाकरेंनी यावेळी लगावला. काँग्रेसचा आमच्यावर अजिबात दबाव नाही. आम्ही एनडीएमध्ये असतो तरीही अशीच भूमिका घेतली असती. आमची भूमिका पक्षाच्या कार्यकर्त्याला पटली आहे. कलम ३७० हटवले, हिंदू पंडितांना जमिनी मिळाल्या का? केंद्र सरकारने आर्थिक संकटावर चर्चा करावे.. केंद्र सरकारने देशाच्या हिताचा निर्णय घेतला तर पाठिंबा देऊ, असे ठाकरेंनी सांगितले.

काँग्रसेचा दबाव नाही. भाजपचा दबाव नाही. जे वाटतं, पटतं ते करतो. मी अंधभक्त नाही. भाजपची पावलं ज्या पद्धतीने पडत आहेत, तुम्हाला वक्फमध्ये सुधारणा करायच्यात त्या करा. पण आमच्या मंदिरांवरही उद्या याल. तुम्ही हिंदूंचे राखणदार नाही का?
उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री

यांचा जमिनीवर डोळा आहे. मुस्लिमांचा कळवळा घेणारी भाषण भाजपने संसदेत केली. अमित शाहपासून सर्वांनी केली. जिनांनाही लाजवेल अशी ही भाषणं होती. हे मुस्लिमांच्या बाजूने आहेत की नाही. मग हिंदुत्वाचं काय झालं? हिंदूत्व सोडलं का? असा निशाणा यावेळी ठाकरेंनी लगावला.

तर झेंड्यावरचा हिरवा रंग काढा

आम्ही हिंदुत्व सोडलं, असं तुम्ही म्हणता. ते गद्दार मुस्लिमांची स्तुति करत होते, तेव्हा तुम्ही शांत का बसले? कुठे गेले बाळासाहेब ठाकरे यांचे विचार? भाजपला मी आवाहन करतो किंवा आव्हान करतो. तुम्ही झेंड्यावरचा हिरवा रंग काढा. आम्ही विधेयकाला नव्हे तर भ्रष्टाचाराला विरोध केला आहे, हे जमिनी बळाकवणार आहेत आणि मित्रांच्या घशात तुम्ही जमिनी घालणार आहात काय, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी आज केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT