मोठी बातमी ! भीमा कोरेगाव आणि शहरी नक्षलवाद प्रकरणात पहिला जामीन मंजूर Saam TV
मुंबई/पुणे

मोठी बातमी ! भीमा कोरेगाव आणि शहरी नक्षलवाद प्रकरणात पहिला जामीन मंजूर

मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयाने हा आदेश दिला आहे. सुधा भारद्वाज ह्या सुद्धा व्यावसायिक वकील आहेत.

सुरज सावंत

मुंबई : भीमा कोरेगाव आणि शहरी नक्षलवाद प्रकरणात पहिला जामीन मंजूर झाला आहे. सुधा भारद्वाज यांची 50 हजार रुपयाच्या कॅश security आणि अन्य अटीसह जामिनावर मुक्तता करण्यात आलेली आहे. मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयाने हा आदेश दिला आहे. सुधा भारद्वाज ह्या सुद्धा व्यावसायिक वकील आहे. त्या छत्तीसगडमध्ये आपल्या वकीलीची प्रॅक्टिस करतात त्यामुळे त्यांना सवलत देण्यात यावी अशी याचीका करण्यात आली होती.

याचिकाकर्त्या वर्षाहून अधिक काळ तुरुंग वासात आहेत, त्या 60 वर्षांच्या असून छत्तीसगड येथे वकिलीचा व्यावासाय करतात. त्यांना मुंबईत वास्तव्यास ठिकाण नाही. न्यायालयाने हे पाहता याचिकाकर्त्यांना कॅश security वर सोडण्याचे आदेश दिले आहेत. कॅश security वर सोडण्याबाबत सरकारी पक्षाचा आक्षेप आहे. त्यांना संशय आहे की, आरोपीकडून पुरव्यांशी छेडछाड केली जाऊ शकते , तसेच याचिकाकर्त्यांना महिन्यातून एकदा NIA कोर्टात हजर राहण्यासाठी बंधनकारक करावे अशी मागणी कोर्टाकडे केली आहे. कोर्टाच्या परवानगी शिवाय बाहेर जाता येणार नाही.

3 नातेवाईकांची राहत्या घराच्या पत्त्यासह माहिती देण्यात यावी. आपली राहती जागा बदलताना कोर्टाला कळवणे गरजेचे आहे. प्रसार माध्यमात ह्या केस संदर्भात कोणताही प्रकारचे वक्तव्य करू नये. गरज असल्यास कोर्टाच्या सुनावणी साठी हजर होण्याचे आदेश कोर्टाने जामीन देताना दिले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

SCROLL FOR NEXT