Atal Setu Accident Viral Video Saam Tv
मुंबई/पुणे

Atal Setu Accident Video: अटल सेतूवर पहिला भीषण अपघात; दुभाजकाला धडक देऊन कार उलटली, पाहा VIDEO

Atal Setu Accident Viral Video: देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलावर मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर भीषण अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे.

Satish Kengar

First Accident On Atal setu:

देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलावर मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर भीषण अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ रविवारचा आहे. व्हिडिओमध्ये लाल रंगाची कार रस्त्यावर उलटताना दिसत आहे. हा संपूर्ण व्हिडीओ अपघात झालेल्या कारच्या मागून येणाऱ्या वाहनामध्ये बसवलेल्या डॅश कॅममध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे.

हा अपघात रविवारी दुपारी 2.50 च्या सुमारास झाला आहे. अटल सेतूवर लाल रंगाची कार दुभाजकाला धडक देऊन नंतर उलटली. या अपघातात दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अतिवेगामुळे झाला अपघात

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, कार अतिवेगाने येत होती. ती आपल्या पुढील वाहनांना ओव्हरटेक करताना दिसत आहे. दरम्यान ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचा तोल गेला, त्यामुळे मोठा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.  (Latest Marathi News)

दरम्यान, अलीकडेच म्हणजे 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आले. हा पूल मुंबईला नवी मुंबईशी जोडतो. पुलाच्या बांधकामामुळे लोकांचा सुमारे तासाभराचा वेळ वाचत आहे.

AI सह सुसज्ज 400 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले

अटल सेतूच्या सुरक्षेसाठी AI ने सुसज्ज 400 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पुलावर कोणतेही वाहन खराब किंवा कोणी संशयास्पद व्यक्ती दिसल्यास हे कॅमेरे तात्काळ नियंत्रण कक्षाला कळवतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT