Mumbai Fire :  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire : मुंबईच्या लोअर परळमधील इमारतीला भीषण आग, ४ अग्निबंब घटनास्थळी

Mumbai lower parel Fire Update : मुंबईच्या लोअर परळ येथील शाह अँड नाहर इंडस्ट्रीजच्या एका गाळ्याला लागल्याची घटना घडली. इमारतीमधील गाळ्याला आग लागल्यानंतर लोकांमध्ये एकच पळापळ झाली.

Vishal Gangurde

सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील लोअर परळ एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या गाळ्याला सोमवारी दुपारी ही आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ४ अग्निबंब घटनास्थळी पोहोचले. या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोअर परळ येथील शाह अँड नाहर इंडस्ट्रीजला आग लागल्याची घटना घडली आहे. शाह अँड नाहर इंडस्ट्रीजच्याा एका गाळ्याला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं. यावेळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे ४ अग्निबंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाचे जवानांनी पोहोचल्यानंतर आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

मुंबईतील लोअर परळच्या शाह अँड नाहर इंडस्ट्रीजच्या एका गाळ्याला आग लागली. आग लागल्यानंतर इमारतमधील लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. गाळयाला आग लागल्यानंतर इमारतीमधील लोक खाली उतरले. तर घटनास्थळी देखील बघ्यांची गर्दी झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी आग विझविण्यासाठी आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले.

पिंपरी-चिंचवडमध्ये कारखान्याला भीषण आग

पिंपरी चिंचवड शहरातील एका कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. हा कपड्याचा आणि पेपर प्लेटचा कारखाना आहे. आग लागल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचला. या कारखान्यातील गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. या आगीच्या धुरामुळे परिसरात धुराचे लोट पसरले. तर आगीमुळे कारखान्याचे भरपूर नुकसान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT