fire broke out in kohinoor Dadar Building parking in shivaji park area mumbai  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Fire Updates: दादरमधील कोहिनूर इमारतीच्या पार्किंगला मध्यरात्री भीषण आग; १६ ते १७ वाहने जळून खाक

Dadar Building Fire News: मुंबईच्या दादरमधील कोहिनूर इमारतीमध्ये मुंबई महापालिकेच्या पार्किंगमध्ये सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली.

Satish Daud

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai Dadar Building Fire News

मुंबईच्या दादरमधील कोहिनूर इमारतीमध्ये मुंबई महापालिकेच्या पार्किंगमध्ये सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली. चौथ्या मजल्यावर लागलेल्या या आगीत जवळपास १७ ते १८ वाहने जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र, आगीमुळे इमारतीचं तसंच वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. दादरमधील कोहिनूर इमारतीत कंत्राटदाराकडून नियमांचं उल्लंघन करुन गाड्यांची पार्किंग केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळेच ही आग लागल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

दरम्यान,ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास स्थानिक पोलिसांकडून केला जात आहे. कोहिनूर स्क्वेअर इमारत मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात आहे. शिवसेना भवन समोरच ही इमारत असून या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते.

सोमवारी मध्यरात्री कोहिनूर इमारतीमध्ये मुंबई महानगर पालिकेच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री मोठी आग लागली.पार्किंगमध्ये चौथ्या मजल्यावर ही मोठी आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं.

अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल एक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आलं. सुदैवानं आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मात्र कोहिनूर इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या १६ ते १७ गाड्या जळून खाक झाल्या आहेत. आग कशामुळे लागली या संदर्भात अधिक तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

SCROLL FOR NEXT