Kalyan Fire News Saam TV
मुंबई/पुणे

Kalyan Fire News : मोठी दुर्घटना! कल्याण स्टेशन परिसरातील फुलांच्या दुकानाला भीषण आग;एकाचा होरपळून मृत्यू

शटर बंद असल्याने त्याला दुकानाच्या बाहेर निघता आले नाही.

Ruchika Jadhav

अभिजीत देशमुख

Fire News : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात आगीची मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. एका फुलाच्या दुकानाला पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोकाकूल वातावरण पसरले आहे. (Kalyan)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या एका फुलाच्या दुकानाला आग लागल्याची घटना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. दुकानाचे शटर बंद करून एक कामगार दुकानात झोपला होता. शटर बंद असल्याने त्याला दुकानाच्या बाहेर निघता आले नाही. त्यामुळे आगीत होरपळून मृत्यू झाला.

मयत इस्माचे नाव करण असल्याचे समोर आले असून तो या दुकानात काम करत होता. रात्री काम आटपून तो दुकानाचे शटर बंद करून दुकानात झोपला होता. दरम्यान घटनेची माहिती मिळतच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. मयत इसमाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT