Fire breaks out in Byculla building in Mumbai 12 fire tenders on spot Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Fire: भायखळ्यात अग्नितांडव! मदनपुरा परिसरातील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाचे १२ बंब घटनास्थळी

Byculla Fire Incident: मदनपुरा येथे सैफी इमारतीला गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत काही रहिवासी अडकून पडल्याची माहिती आहे.

Satish Daud

Mumbai Byculla Fire Incident

मुंबईच्या भायखळा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मदनपुरा येथे सैफी इमारतीला गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत काही रहिवासी अडकून पडल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तब्बल १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, भायखळा परिसरातील मदनपुरा येथे सैफी इमारत आहे. या इमारतीला पहाटे ८ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली.

आग लागल्याचं कळताच इमारतीत राहत असलेल्या रहिवाशांनी बाहेर धाव घेतली. बघता-बघता आगीने इमारतीला विळखा घातला. या आगीत काहीजण अडकल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरू असून आतापर्यंत ५ जणांना रेस्क्यू करण्यात आल्याची माहिती आहे.

ठाण्यातील सरीवर दर्शन इमारतीला भीषण आग

ठाणे शहरातील पाचपाखाडी परिसरातील सरीवर दर्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पार्किंगमध्ये अचानक आग लागली. या आगीत ११ दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. याशिवाय ३ चारचाकी वाहनांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पार्किंगमध्ये वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. आगीचं कारण अस्पष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Bigg Boss 19'च्या तिसऱ्या आठवड्यात होणार डबल एलिमिनेशन? 4 सदस्य झाले नॉमिनेट

Gold Rate: सोन्याचे दर पुन्हा वाढले; प्रति तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : राज्यातील ७५ हजार युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार - लोढा

MHADA Home : सर्वसामान्यांच्या स्वप्नांना ब्रेक! म्हाडाच्या घरांची दिवाळीतील सोडत रखडली, जाणून घ्या कारण

Pune : पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद | VIDEO

SCROLL FOR NEXT