Timber Market Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Fire News: टिंबर मार्केट परिसरातील लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग; अग्निशमन दलाचे 30 बंब घटनास्थळी

Timber Market Fire: पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव

Shivani Tichkule

अक्षय बडवे

Pune Big News Today: पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भवानी पेठ येथील टिंबर मार्केटमध्ये एका लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग लागली असून शेजारील चार घरांना ही या आगीची झळ बसली आहे. ही आग पहाटे ४.१४ वाजताच्या सुमारास लागली आहे. ही आग एवढी भीषण आहे की, आगीचे आणि धुराचे लोट दूरवरुन दिसत आहे. (Latest Marathi News)

या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दलाचे (Fire Brigade) तब्बल ३० बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाकडून आग (Fire) विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. असे असले तरी ही आग एवढी भीषण आहे की यात लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

30 अग्निशमन वाहने घटनास्थळी

या घटनेची माहिती मिळताच पुणे-पुणे कॅन्टोमेंट-पीएमआरडीए आणि पालिकेच्या अग्निशमन दलाची एकुण 30 अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. (Pune News)

आग एवढी भीषण असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पथकाला अनेक अडचणी येत असल्याची माहिती पुणे अग्निशामक दलाचे प्रसिद्धी प्रमुख नीलेश महाजन यांनी माहिती दिली.घटनास्थळी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासमवेत इतर २० अधिकारी व जवळपास १०० जवान उपस्थित आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Rain: महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे गेला जीव, भांडुपमध्ये विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; थरारक VIDEO

Soft Thepla: मऊ आणि स्वादिष्ट थेपले कसे बनवायचे? सोप्या आणि महत्त्वाच्या ट्रिक्स

Ladki Bahin : धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या 1183 कर्मचाऱ्यांनीही घेतले लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये!

Maharashtra Rain Live News : जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

आई होण्याचं योग्य वय कोणतं मानलं जातं?

SCROLL FOR NEXT