Ashish Shelar
Ashish Shelar SaamTv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: आशिष शेलार यांच्या नावाने आर्थिक फसवणूक; कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी पैसे उकळणारे दोघे अटकेत

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Mumbai Crime News: भाजपचे आमदार तथा भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नावाने फसवणूक करणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. प्रसिद्ध महाविद्यालयात विद्यार्थ्यांला अॅडमिशन देण्याच्या नावाखाली आरोपींनी ही फसवणूक (Fraud) केली आहे. अॅडमिशनसाठी आरोपींनी आशिष शेलार (Ashish Shelar) यांचे बनावट लेटरहेड आणि त्यावर बनावट डिजिटल सही केली. या लेटरच्या मदतीने आरोपींनी 1 लाख 30 हजार उकळले असल्याचे तपासात समोर आले आहे. (Mumbai Fraud News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष शेलारांच्या नावे देण्यात आलेल्या शिफारस पत्राची खात्री करताना हे लेटर बनावट असल्याचे समोर आले. या प्रकरणी तक्रारदाराने वांद्रे पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार वांद्रे पोलिसांनी 420,465, 467,468, 471,170 भादवि कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या वैभव अग्रवाल (22) आणि दीप वेद (29) या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

SCROLL FOR NEXT