हसन मुश्रीफ Saam Tv
मुंबई/पुणे

ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि ZP साठी केंद्राकडून 861.40 कोटी - मुश्रीफ

ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकरिता केंद्राचा रुपये 861.40 कोटींचा दुसरा हप्ता प्राप्त

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या (15th Finance Commission) शिफारशीनुसार केंद्र सरकारच्या (Central Government) वित्त मंत्रालयाने ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या त्रिस्तरीय ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता दुसऱ्या हप्त्यापोटी रूपये 861.40 कोटी इतका निधी राज्याला प्राप्त झाला आहे. हा निधी ग्रामीण स्वराज्य संस्थांना वितरित करण्यासाठी वित्त विभागाने मान्यता दिली असल्याने आता राज्यातील प्रत्येक गावागावात विकासकामे त्याचप्रमाणे स्थानिक गरजेची कामे हाती घेण्यात येतील, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज दिली.

हे देखील पहा :

केंद्र सरकारकडून ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या त्रिस्तरीय ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वित्तीय वर्ष 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये एकूण 4,307 कोटी रूपये निधीपैकी अबंधित / अनटाईड ग्रँडचा पहिला हप्ता रूपये 861.40 कोटी वितरित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सन 2021-22 या आर्थिक वर्षाच्या बंधित ग्रँडच्या (टाईड) पहिल्या हप्त्याचे रूपये 1292.10 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे.

पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायतींना एकूण निधीच्या 80 टक्के, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना प्रत्येकी 10 टक्के निधीची वाटप करण्यात येते. त्यानुसार या त्रिस्तरीय ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना पहिल्या हप्त्यापोटी एकूण 2153.50 कोटी आणि दुसऱ्या हप्त्यापोटी रूपये 861.40 कोटी असे एकूण 3014.90 कोटी रूपये वितरित झाले असल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता केंद्र सरकारकडून 2021-22 या आर्थिक वर्षात एकूण 4,307 कोटी रूपये इतका निधी येणार होता. त्यापैकी 3014.90 कोटी रूपये प्राप्त झाले असून 1292.10 कोटी रूपयांची निधी बाकी असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

या निधींचा विनियोग ग्रामिण स्थानिक स्वराज्य संस्थांना कर्मचारी पगार तथा आस्थापना विषयक बाबी वगळून इतर स्थानिक गरजांनुसार आवश्यक बाबीसाठी करण्यात यावा. गावाची स्वच्छता, पेयजल पाणीपुरवठा, जल पुन:प्रक्रिया, हागणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थिती कायम राखणे आदी कामांसाठी या विकास निधीचा विनियोग करावा, असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व यंत्रणेला दिले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

Maharashtra Live News Update: भारत मुक्ती मोर्चाची इंदोरा चौकातून सुरुवात

DVT symptoms: जास्त वेळ बसणं आणि धूम्रपानामुळे रक्ताच्या गाठींचा धोका वाढतोय; तज्ज्ञांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

SCROLL FOR NEXT