पत्नीचा पाठलाग करणाऱ्या पती विरोधाक गुन्हा दाखल  Saam Tv
मुंबई/पुणे

पत्नीचा पाठलाग करणाऱ्या पती विरोधाक गुन्हा दाखल

डिसेंबर 1996 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. तेव्हापासून पती तिला मारत असल्याचा आरोप तिने केला आहे.

सुरज सावंत

मुंबई: चार मुलांसोबत वेगळ्या राहणा-या पत्नीचा पाठलाग केल्याप्रकरणी दिवंगत वरिष्ठ आयपीएस अधिका-याच्या मुलाविरोधात वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 23 जूनला आरोपीला कौटुंबिक हिंसा व हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत जामिन मिळाला होता. त्याप्रकरणी त्याला 21 मार्चला पोलिसांनी अटक केली होती.

डिसेंबर 1996 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. तेव्हापासून पती तिला मारत असल्याचा आरोप तिने केला आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात पतीने तिला व तिच्या चार मुलांना मारहाण केली त्यानंतर त्यांनी घर सोडले होते. त्याच्या पत्नीने गेल्यावर्षी आरोपीविरोधात कौटुंबिक हिंसा व हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी त्याला उच्च न्यायालयाकडून जामिन मिळाली होता. पण आरोपीने जामिनाच्या अटी शर्थीचे उल्लंघन केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.

आरोपीला जामीनासाठी महिलाचा पाठलाग अथवा तिला कोणताही त्रास न देण्याची अट घालण्यात आली होती. याशिवाय महिलेला पोलिसांचे संरक्षणही देण्यात आले होते. महिलेने याप्रकरणी पोलिसांना दूरध्वनी करून आरोपी तिच्या इमारती खाली उभा असून ती मुलांसोबत बाहेर गेली असता त्याने कारमधून तिचा पाठलाग केल्याचाही आरोप केला आहे.

याप्रकरणी सुरक्षा रक्षकानेही आरोपीला इमारतीखाली पाहिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी 354(ड ) व 506(2) भादंवि कलमांतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांच्या आधारावर पोलीस आरोपीच्या जामिनाला न्यायालयात विरोध करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी संपतीने पत्नीने त्याच्याविरोधातील आरोप मागे घेतले होते. पतीनेही ती राहत असलेल्या परिसरात जाणार नसल्याचे मान्य केले होते. त्यानंतर 50 हजारांच्या जात मुचलक्यावर पतीला जामिन मिळाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

SCROLL FOR NEXT