Fedex Scam Alert  Saam tv
मुंबई/पुणे

Fedex Scam Alert : डिजिटल अरेस्टनंतर आलाय नवा स्कॅम; फेडएक्सने लोकांना दिला सतर्कतेचा इशारा

Fedex Scam Alert update :डिजिटल अरेस्टनंतर आलाय नवा स्कॅम आला आहे. फेडएक्सने लोकांना याबाबत सतर्कतेचा मोठा इशारा दिला आहे. तसेच काही सूचना देखील दिल्या आहेत. जाणून घ्या.

Vishal Gangurde

मुंबई : फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन (फेडएक्स) या जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपनी मानली जाते. याच फेडएक्सच्या कर्मचाऱ्यांच्या नावे होणाऱ्या तसेच इतर फसवाफसवीच्या कारवायांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे. फसवाफसवीला बळी पडणाऱ्यांना बऱ्याचदा आर्थिक नुकसान आणि मनस्ताप सोसावा लागतो.

फसवाफसवी कशी होते?

स्कॅम करणारे घोटाळेबाज कुरियर प्रतिनिधी असल्याचे सांगतात. फेडएक्सचे प्रतिनिधी असल्याचा बनाव करतात. त्यानंतर खोटा आरोप करतात की, तुमच्या पार्सलमध्ये अवैध वस्तू असल्याचे सांगतात. बळी पडणाऱ्यांची कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या बनावट अधिकाऱ्याशी गाठ घालून दिली जाते. जे कायदेशीर कार्यवाई किंवा डिजिटल अटकेची धमकी देतात. हा त्रास टाळण्यासाठी तत्काळ पैशांची मागणी करतात. एकदा पैसे हस्तांतरित केल्यानंतर घोटाळेबाज गायब होतात आणि तुमचे मात्र मोठे नुकसान होते.

तुम्ही काय केले पाहिजे?

फेडएक्स कोणत्याही ईमेल किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे खात्याची माहिती मागत नाही. त्याचबरोबर ओळखीसंबंधी व्यक्तिगत माहिती मागत नाही. फेडएक्स कायदा हा अंमलबजावणी अधिकाऱ्यांशी संबंधित नसून त्यांच्याकडून कारवाई देखील केली जात नाही. कुरियर सेवांचे प्रतिनिधित्व करण्याचे नाटक करणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांपासून सावध रहा. त्यांच्या धमकी किंवा संशयित विनंतीला प्रतिसाद देऊ नका. तसेच त्यांना पैसेही हस्तांतरित करू नका. अशा फसवणुकीला बळी पडल्यास १९३० वर कॉल करा. तसेच तुम्ही सायबरक्राईम जीओव्ही.इन ला भेट देऊन त्याबद्दल कळवा.

स्वतःच्या रक्षणासाठी सुरक्षा टिप्स:

फेडएक्स किंवा इतर कुरियर प्लॅटफॉर्मचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करून केल्या जाणाऱ्यांपासून सतर्क रहा.

मेसेज किंवा कॉल्स पडताळून घ्या.

घाईघाईने कोणतेही पेमेंट करण्याचे टाळा. स्रोताची पडताळणी केल्याशिवाय कधीच पैसे हस्तांतरित करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याला लकाकी, प्रति तोळा १ लाख २४ हजारांच्या पार; आज किती रूपयांनी महागले गोल्ड?

Pimpri Chinchwad Police : शेतकऱ्यांच्या मदतीला सरसावले पिंपरी चिंचवड पोलीस; ४४ लाख रुपयाची मदत

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी! 'त्या' GR ला स्थगिती देण्यास नकार, कोर्टात नेमकं काय घडलं?

Virar News: माझ्या आईला न्याय द्या! चिमुरडीचं हृदयस्पर्शी आंदोलन|VIDEO

Maharashtra Live News Update : मराठा आरक्षण संदर्भात मोठी बातमी, GR ला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

SCROLL FOR NEXT