Navi Mumbai Saam
मुंबई/पुणे

नवी मुंबईतील बिल्डरनं डोक्यात गोळी घालून स्वत:ला संपवलं; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर | Navi Mumbai

Father of Notorious Drug Lord Naveen Chichaker Killed Himself: भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज सिंडिकेटचा प्रमुख नवीन चिचकर यांचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक गुरु चिचकर यांनी स्वत:च्या राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

Bhagyashree Kamble

भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज सिंडिकेटचा प्रमुख नवीन चिचकर याचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक गुरु चिचकर यांनी स्वत:च्या राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुसाईड नोट जप्त केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, विभागीय अधिकाऱ्यांच्या सततच्या जाचाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी गुरू चिचकर यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. पोलीस तपासात गुरू चिचकर यांनी लिहिलेली सुसाईड नोट सापडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरू चिचकर हे नवीन चिचकर यांचे वडील आहेत. नवीन चिचकर हा मोस्ट वॉन्टेड असून, ड्रग सिंडिकेटचा प्रमुख आहे. नवीन चिचकर सध्या देश सोडून पळून गेला आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. गुरू आपला ड्रग्जचा व्यवसाय देशाबाहेरून चालवतो. सध्या एनसीबी पथकही नवीन चिचकराच्या शोधात आहेत.

गुरू चिचकरांनी आत्महत्या का केली?

मिळालेल्या माहितीनुसार, गुरू चिचकर यांनी सकाळी राहत्या घरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्येसाठी त्यांनी 9 MM गोळीच्या पिस्तूलाचा वापर केला. गुरू चिचकर यांनी आत्महत्या मानसिक दबाव आणि त्यांच्या मुलाच्या गुन्ह्यांमुळे होणारा ताण यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

Diwali: दिवाळीच्या दिवशी 'या' ठिकाणी पणती लावा, देवी लक्ष्मी होईल प्रस्नन

SCROLL FOR NEXT