Sanjay Raut/ kirit somaiya  Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut: बाप-बेटे जेल जायेंगे; सोमय्यांबद्दल संजय राऊतांचं ट्विट

आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणात किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील या पिता-पुत्रांना कोर्टानं कोणताही दिलासा दिला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणात किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील या पिता-पुत्रांना कोर्टानं कोणताही दिलासा दिला नाही. सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करून नेम साधला आहे. बाप-बेटे जेल जायेंगे...असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यानंतर मोहित कंबोज यांनी संजय राऊतांवर पलटवार करणारं ट्विट केलं आहे.

आयएनएस विक्रांत निधीत घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर, किरीट सोमय्या अडचणीत सापडले आहेत. सोमय्या यांनी कोर्टात धाव घेतली होती. अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी अर्ज केला होता. मात्र, कोर्टानं त्यांना दिलासा दिला नाही. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. तर नील यांच्या अर्जावर उद्या निर्णय होणार आहे. सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे मानले जात असतानाच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांबद्दल ट्विट केलं आहे.

बाप-बेटे जेल जायेंगे, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या बाजूच्याच कोठडीत त्यांचा मुक्काम असेल, असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावेळी त्यांनी एक शेरही शेअर केला आहे. राऊत यांच्या ट्विटला मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी उत्तर दिलं आहे. बाप-बेटे जेलमध्ये जाणार नाहीत. राऊत यांचं स्वप्न हे केवळ स्वप्नच राहणार आहे. पण माझं हे ट्विट सेव्ह करून ठेवा. कोण लवकर जेलमध्ये जातोय, हे बघूया, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावेळी त्यांनी तारीख, वेळ आणि सेव्ह माय ट्विट! देखते रहो, असंही लिहिलंय.

राऊत यांनी केला होता खळबळजनक दावा

यापूर्वी, राऊत यांनी सोमय्या यांच्याबद्दल बोलताना, खळबळजनक दावा केला होता. सोमय्या आणि त्यांचा मुलगा फरार झाले आहेत, असं ते म्हणाले होते. सोमय्या हे घाबरले आहेत. मेहुल चोक्सी जिथे लपला आहे, तिथे तर गेले नाहीत ना, अशी शंका त्यांनी उपस्थित केली होती. 'विक्रांत' निधीचा घोटाळा मोठा आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे, असंही राऊत म्हणाले होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Sweet Foods For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी ५ गोड पदार्थ फायदेशीर; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

H1N1 flu symptoms: साधा ताप समजून दुर्लक्ष करताय? H1N1 ची ही गंभीर लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या

Tingling In Feet : तुमच्या पायांना सतत मुंग्या येतात; 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, असा कराल बचाव?

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावरील दरोडाच्या सूत्रधार बीडमधून जेरबंद

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा? 14,298 पुरुषांना मिळाले ₹1,500; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT