Maharashtra Politics Uddhav thackeray Saamana Editorial Criticism CM Eknath Shinde  Saam TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray: शेती नुकसानीबाबत आवाज उठवा, सरकारला जाब विचारा; उद्धव ठाकरेंनी आमदारांना काय सूचना दिल्या?

Uddhav Thackeray News: हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मातोश्री निवास्थानी ठाकरे गटाची महत्वाची बैठक पार पडली.

Satish Daud

Uddhav Thackeray Latest News

अवकाळी पाऊस, मुंबईतील प्रदूषण आणि शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबत अधिवेशनात आवाज उठवा, तसेच पीक विम्याबाबत सरकारला जाब विचारा, अशा सूचना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिल्या आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मातोश्री निवास्थानी ठाकरे गटाची महत्वाची बैठक पार पडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या बैठकीत उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांना या सूचना दिल्या आहेत. बैठकीला खासदार अनिल देसाई, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे , अजय चौधरी आमदार ऋतुजा लटके, विलास पोतनीस, सुनील शिंदे, मिलिंद नार्वेकर, यांच्यासह इतर आमदारांची उपस्थिती होती.

शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर यांना दत्ता दळवी काल पोलिसांनी अटक केली. त्यांच्या अटकेबाबत देखील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर शिंदे गटाला घेरण्यासाठी पुढची रणनिती काय असेल, यावरही बैठकीत खलबतं झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे जेव्हा २०१९ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी विधासभेतील भाषणादरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. त्यामुळे ठाकरे नावाची शेतकऱ्यांमध्ये क्रेझ आहे. आता देखील राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. याच मुद्द्याला हाताला धरून ठाकरेंनी रणनिती आखली आहे.

अवकाळी पाऊस, मराठा-ओबीसी आरक्षण, मुंबईतील प्रदूषण तसेच पीकविम्याबाबत सरकारला जाब विचारा, अधिवेशनात आवाज उठवा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटातील आमदारांना दिल्या आहेत. तसेच अधिवेशनात कोणत्या मुद्द्यावर सरकारला घेरायचे या संदर्भात महत्त्वाची चर्चा झाल्याचं सांगितलं जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT