ravikant tupkar
ravikant tupkar saam tv
मुंबई/पुणे

Ravikant Tupkar : रविकांत तुपकार जलसमाधी आंदोलनावर ठाम; राज्य सरकारला दिला १५ दिवसांचा वेळ

साम टिव्ही ब्युरो

भूषण शिंदे

Ravikant Tupkar News : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी जाहीर केलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी मागे घेतले आहे. मंत्रालयाशेजारील समुद्रातील जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर शिंदे सरकारने शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. तसेच रविकांत तुपकर यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चर्चा करत मदतीचे आवाहन केले. त्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलन मागे घेतले आहे. (Latest Marathi News)

शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. या बैठकीत शिंदे सरकारने तुपकर यांना मदतीचे आवाहन केले आहे. त्यानंतर तुपकरांनी आंदोलन मागे घेतले. या बैठकीनंतर शिंदे सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र, राज्य सरकारने दिलेला शब्द फिरकवला तर, पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा तुपकर यांनी दिला.

तसेच तुपकर यांनी राज्य सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांचा वेळ दिला आहे. यासोबत राज्यातून एक शिष्टमंडळ दिल्लीत जाऊन केंद्र सरकारसोबत चर्चेसाठी जाणार आहे.

शिंदे सरकारची शेतकऱ्यांना १५७ कोटींची मदत

शिंदे सरकारने बुधवारी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Farmers) मदत जाहीर केली. दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 157 कोटीची मदत सरकारने जाहीर केली.

दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिरायत पिकांसाठी 13600 रुपये प्रति हेक्टर, बागायती पिकांसाठी 27000 हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी 36000 रुपये प्रति हेक्टर मदत सरकारने जाहीर केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Rikshaw Viral Video | भर उन्हात रिक्षावाल्याचा एक नंबर जुगाड!

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राडा आणि हायव्हॉल्टेज ड्रामा! बारामतीत काका-पुतण्याचे समर्थक आमने-सामने

Peruchi Chatani: चटकदार! कच्च्या पेरूची स्वादिष्ट चटणी, सोपी रेसिपी

Health Tips: जमिनीवर बसून जेवण करण्याचे फायदे माहिती आहेत का?

Amol Kolhe: आधी आरोप, आता थेट पुरावे दाखवले; अमोल कोल्हेंनी वाढवलं आढळराव पाटलांचं टेन्शन.. प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT