Vashi News
Vashi News Saam TV
मुंबई/पुणे

Vashi News : पाण्याच्या टाकीचं बांधकाम करताना खाली कोसळला; कामगाराचा जागीच मृत्यू; वाशीमधील दु:खद घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्धेश म्हात्रे

वाशी येथून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. नवीन पाण्याच्या टाकीच्या बांधकामादरम्यान तिसऱ्या मजल्यावरून खालीपडून एका कामगाराचा मृत्यू झालाय. सदर बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी सेफ्टी जाळी नव्हती. त्यामुळे खाली कोसळून कामगाराचा मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ठाण्यात सेफ्टी ऑफिसर आणि सब कॉन्ट्रॅक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र या प्रकरणातून मनपा अधिकारी आणि मुख्य कंत्राटदाराला जाणीवपूर्वक वाचविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येतोय.

कामगाराच्या मृत्यूनंतर अन्य कामगारांनी हळहळ व्यक्त केलीये. मृत कामगाराच्या कुटुंबियांकडून देखील आक्रोश आणि संताप व्यक्त केला जात आहे. रोजच्याप्रमाणे कामावर जाताना आज आपल्यासोबत असं काही घडेल याची पुसटशीही कल्पना या कामगाराला नव्हती. या घटनेनंतर तरी मनपा अधिकारी आणि मुख्य कंत्राटदार कामगारांच्या सुरक्षेकडे लक्ष देणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणारे.

पाण्याची टाकी साफ करताना विजेचा धक्का; ३ कामगारांचा मृत्यू

याच महिन्यात ४ तारखेला अंबरनाथमध्ये देखील अशीच एक घटना घडली होती. अंबरनाथजवळील जांभूळ गावात विजेचा धक्का लागून तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. पाण्याच्या टाकीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली होती.

टाकीतून पाणी उपसण्याचे काम सुरू असताना पाणी उपसा करणाऱ्या मोटारमधून विद्युत प्रवाह पाण्यात उतरला. पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे कामगारांना विजेचा जोरदार झटका बसला यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangali News: सांगली, पुण्यासह ५ रेल्वेस्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी; संशयित आरोपीला मुंबईतून अटक

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट; एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला, घरांची पडझड VIDEO

Virat Kohli Crying : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली रडला; अनुष्कालाही फुटला अश्रूंचा बांध, VIDEO व्हायरल

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

SCROLL FOR NEXT