Pune News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Latest News : शिरुरमध्ये बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; रॅकेटचे धागेदोरे दिल्लीपर्यंत असल्याचा पोलिसांना संशय

Fake Currency Making gang busted in Shirur : शिरुर शहराजवळील रामलिंग रोडवर एका फ्लॅटमध्ये बनावट नोटांच्या छापखान्यावर रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी छापा मारला.

रोहिदास गाडगे

Pune News :

पुण्यात बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शिरुरमध्ये बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट कार्यरत होतं. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी या आरोपींना अटक केली असून बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. या रॅकेटचे धागेदोरे दिल्लीपर्यंत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शिरुर शहराजवळील रामलिंग रोडवर एका फ्लॅटमध्ये बनावट नोटांच्या छापखान्यावर रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी छापा मारला. या ठिकाणाहून नोटा बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बनावट नोटा वाटण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक केल्यानंतर बनावट नोटांचे रॅकेट उघड झाले आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी मनीष अमरपाल याला अटक केली आहे. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या ३० हजार रुपये किमतीच्या बनावट जप्त करण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

यावेळी आरोपी वास्तव्यास असणाऱ्या फ्लॅटमध्ये बनावट चलन तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, कागद, कलर, प्रिंटर पोलिसांनी जप्त केले आहे. बनावट नोटांच्या रॅकेटचे धागेदोरे दिल्लीपर्यत असल्याचा अंदाज रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी व्यक्त केला असून पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Fashion Tips :हिवाळ्यात Cool अन् Cozy लूक हवाय? 'या' फॅशन टिप्स फॉलो करा, प्रत्येकजण तुम्हाला पाहून वेडा होईल

satyanarayan vrat 2024: सत्यनारायणाची पूजा करायचीय? या महिन्यातील हा दिवस शुभ, जाणून घ्या मुहूर्त आणि विधी

Kanguva Movie Review: दमदार ॲक्शनवाला सूर्या आणि बॅाबी देओलचा 'कांगुवा ' प्रदर्शित, प्रेक्षकांना कसा वाटला चित्रपट जाणून घ्या

Durga Serial: दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात येणार दुरावा? मालिकेमध्ये नेमकं असं काय घडणार?

Gujarat : सुट्टीत मित्रांसोबत तुफान मजा करा, गुजरातच्या 'या' खास लोकेशन भेट द्या

SCROLL FOR NEXT