kondhwa police station, southern command liaison unit  saam tv
मुंबई/पुणे

Crime News : आर्मीत भरतीच्या आमिषाने 42 युवकांची पावणेदोन कोटींची फसवणूक, तासगावातून एकास अटक

फेब्रुवारी २०२२ ते १५ सप्टेंबर २०२३ या कालावधी हा प्रकार घडला.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Pune News : सैन्यदलात भरतीचे आमिष दाखवून युवकांची सुमारे पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर्न कमांडच्या लायझन युनिटने या घटनेचा पर्दाफाश केला आहे. सदर्न कमांडच्या लायझन युनिट आणि कोंढवा पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत संशयिताला शुक्रवारी तासगाव येथून अटक केली. (Maharashtra News)

फेब्रुवारी २०२२ ते १५ सप्टेंबर २०२३ या कालावधी हा प्रकार घडला. कोंढव्यातील एका हॉटेलमध्ये फिर्यादीची कराळे साेबत ओळख झाली. कराळेने सैन्यदलात वरिष्ठ अधिकारी माझ्या ओळखीचे असून, भरतीसाठी कोणी मित्र, नातेवाईक असतील तर सांगा,असे फिर्यादी यांना सांगितले.

त्यावर त्याने एका उमेदवाराच्या भरतीसाठी सहा लाख रुपये लागतील असे सांगितले अशा प्रकारे फिर्यादीने ४२ युवकांना भरतीसाठी पैसे देण्यास तयार केले. फिर्यादीने इच्छुक उमेदवारांकडून एक कोटी ८० लाख रुपये घेऊन कराळेला दिले.

कराळेने युवकांकडून (youth) लाखो रुपये आणि मूळ कागदपत्रे घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आले.

त्यानंतर पाेलीसांनी या प्रकरणी कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये येथे पांडुरंग कराळे (वय ४५, रा. पाटील मळा, तासगाव, जि. सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला शुक्रवारी तासगाव येथून अटक करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! जागा थेट २६५ वर; 'या' दोन मोठ्या पदांचा समावेश

Vidhan Parishad Election 2026 : राज्यात विधान परिषदेच्या ११ जागांचा निकाल जाहीर होणार, कोण मारणार बाजी?

Ladki Bahin Yojana : महिना संपायला अवघे ८ दिवस बाकी; जूनचा हप्ता कधी जमा होणार? लाभार्थी महिलांमध्ये ₹१५०० ची उत्सुकता

Mahad Tourism : पावसाळ्यात करा महाडची सफर, 'हे' आहेत ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

'लव्ह अँड वॉर'च्या सेटवर भयंकर अपघात; कामगाराचा दुर्दैवी मृत्यू, संजय लीला भन्साळी नुकसान भरपाई करणार

SCROLL FOR NEXT