Maharashtra Politics Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut : राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या धक्क्यातून फडणवीस सावरले नाहीत, संजय राऊतांचा टोला

Maharashtra Politics : संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप करत भाजप सरकारवर '५० खोके' संस्कृती, निवडणुकीतील भ्रष्टाचार आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून घणाघात केला.

Alisha Khedekar

  • संजय राऊतांनी '५० खोके' या घोषणेबाबत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला

  • गोरंट्याल यांच्या विधानाचा दाखला देत निवडणुकीतील भ्रष्टाचार उघड

  • फडणवीसांनी मंत्रिमंडळातील भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या यावर बोलण्याची मागणी

  • “राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आल्याने फडणवीस गोंधळले,” असा दावा राऊतांचा

महाराष्ट्रात महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असतानाच विरोधकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचार, पैशांचा गैरवापर आणि मराठी भाषेच्या संदर्भातील भूमिकेबाबत जोरदार टीका केली आहे.शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची निर्मिती खोक्यातून झाली असल्याचं खोचक विधान केलं. तसेच कैलास गोरंट्याल यांच्या विधानाचा दाखला देत संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला. आणि ही निवडणूक भाजपने कशी जिंकली त्याबद्दल देखील त्यांनी वक्तव्य केलं.

काय म्हणाले संजय राऊत ?

संजय राऊत म्हणाले "५० खोके एकदम ओके या घोषणाचे जनक कैलास गोरंट्याल यांनी विधानसभा सुरू असताना घोषणा दिली. आणि नंतर ती देशभरात पसरली. ही घोषणा देणार गोरंट्याला फडणवीस यांच्या पक्षात आहेत. त्यांनीच आता असे सांगितले आहे की, विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी एकाएका मतदारसंघात १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पोलिसांची वाहने आणि सरकारी वाहनातून हे पैशांचे वाटप सुरू होते. आमच्यासारखे कार्यकर्ते याला कुठे पुरे पडणार? त्यामुळे आपल्याला भाजपमध्ये यावे लागले, असे गोरंट्याल म्हणाले आहेत. त्यामुळे खोक्याची भाषा फडणवीस यांनी करू नये." असे ते म्हणाले.

"विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी याबाबत माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या १०० जागांवर फेरीफेरी करत विजय मिळवला. त्याबाबत फडणवीस यांनी बोलावे, त्यांच्या मंत्रीमंडळात असलेल्या भ्रष्ट मंत्री असून त्यांची खोक्यांची ओढताण सुरू आहे त्याबाबत त्यांनी बोलायला पाहिजे. राज्यात शेतकऱ्यांच्या आतम्हत्या होत आहेत, बेरोजगारी वाढत आहे, त्याबाबत फडणवीस यांनी बोलले पाहिजे. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत, या धक्क्यातून फडणवीस सावरलेले नाहीत, त्यामुळे ते अशी विधाने करत आहेत. त्यांची वक्तव्ये विनोद समजून सोडून दिली पाहिजेत." असा शाब्दिक निशाणाही संजय राऊत यांनी लगावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याप्रकरणांवर प्रतिक्रिया अद्याप स्पष्ट झालेली नसली, तरी विरोधकांच्या आरोपांमुळे त्यांच्या राजकीय प्रतिमेवर दबाव निर्माण झाला आहे. "मराठी माणसांचा महाराष्ट्र असलेल्या या भूमीत, राज्याचे तुकडे करणाऱ्यांनी गप्प राहावे," असा रोखठोक इशाराही देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या सांताक्रुझमध्ये अपघाताचा थरार; भरधाव बाईकच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, VIDEO

Landslide: उत्तरकाशीत भूस्खलन; शेकडो घरं, दुकानं ढिगाऱ्याखाली दबली, ६० जण बेपत्ता, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Mehndi Design: या रक्षाबंधनला हातावर काढा ही साधे आणि सुंदर मेहंदी डिझाईन्स

Maharashtra Politics : महायुतीत एकनाथ शिंदे अस्वस्थ; अचानक दिल्लीवारी वाढल्या, पडद्यामागं काय राजकारण घडतंय?

Accident: प्रवाशांनी खचाखच भसलेली एसटी बस उलटली, दोघांचा जागीच मृत्यू; चंद्रपूरमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT