Extortion case Saam Tv
मुंबई/पुणे

अंगडिया खंडणी प्रकरण: यूपीतून एकाला अटक, डीसीपी सौरभ त्रिपाठी अद्याप फरार

मुंबई गुन्हे शाखेच्या सीआययू टीमने उत्तर प्रदेश येथील लखनौ येथून एका व्यक्तीला अटक करण्यात आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबई गुन्हे शाखेच्या सीआययू टीमने उत्तर प्रदेश येथील लखनौ (Lucknow) येथून एका व्यक्तीला अटक (Arrested) करण्यात आली आहे. ही ती व्यक्ती आहे, ज्याच्या माध्यमातून डीसीपी सौरभ त्रिपाठी यांना वसुलीची रक्कम पाठवण्यात येत होती, असा दावा गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. सौरभ त्रिपाठी हे देखील उत्तर प्रदेशमधील कानपूर (Kanpur) येथील रहिवासी आहेत. डीसीपी त्रिपाठी हे अंगडियाकडून घेतलेली रक्कम हवालाच्या माध्यमामधून उत्तर प्रदेशात पाठवत होते.

हे देखील पहा-

अंगडियाकडून वसुली प्रकरणामध्ये गुन्हे शाखेने आतापर्यंत एकूण ४ आरोपींना अटक (Arrested) करण्यात आली आहे. त्यापैकी ३ पोलीस अधिकारी आहेत. यादरम्यान अटकेनंतर पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांची झालेल्या पोलीस (Police) चौकशीतून सौरभ त्रिपाठी यांचे नाव बाहेर आले आहे. त्यानंतर सौरभ त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासूनच सौरभ त्रिपाठी बेपत्ता आहेत. त्यांना गुन्हे शाखेने १६ मार्च दिवशी फरार म्हणून घोषित केले आहे. या प्रकरणाच्या तपासणीसाठी एकूण ५ पथके तैनात करण्यात आली आहेत. जे वेगवेगळ्या अँगलने या प्रकरणाची तपासणी केले जाणार आहे.

दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी ओम वंगाटे याची पोलीस कोठडी शनिवारी संपली असून, काल आरोपी वंगाटे यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या दरम्यान, शनिवारी सौरभ त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामिनाकरिता सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. अटकपूर्व जामीन अर्जात त्यांनी सांगितले आहे की, याअगोदर एफआयआरमध्ये त्यांचे नाव नमूद करण्यात आले नव्हते. पोलीस स्टेशन स्तरावर अंगडियाकडून पैसे वसूल केले जात असल्याची माहिती देखील त्यांना नव्हती. त्यांच्या जामीन अर्जावर २३ तारखेला सुनावणी होणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Winter Tourism: एका दिवसाच्या सुट्टीत लोणावळा-खंडाळ्याचा फील घ्यायचाय? मग हे Hidden Spots ठरतील बेस्ट

Maharashtra Live News Update : मावळात दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित

Leopard Attack : धक्कादायक! सरपणासाठी गेल्या परत आल्याचं नाहीत, बिबट्याच्या हल्ल्यात दोन महिलांचा मृत्यू

Maharashtra Politics: मनसे मविआमध्ये जाणार नाही, राज ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीचं मोठं विधान

IND vs SA: गुवाहाटी टेस्टसाठी ऋषभ पंत कर्णधार; गिलची जागा कोण घेणार? पाहा संभाव्य प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT