Extended Metro in Navaratri Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Metro : नवरात्रोत्सवात मेट्रो सुसाट धावणार, प्रवाशांसाठी मेट्रोचा मोठा निर्णय, वाचा नेमका काय फायदा होणार?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवरात्रोतस्वात अनेक तरुण तरुणी रात्री उशिरापर्यंत गरबा खेळत असतात. अशाच तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नवरात्रीमध्ये रात्रीच्यावेळी प्रवास करण्यासाठी जास्तीच्या मेट्रो सोडण्यात येणार आहेत. या मेट्रो फेऱ्यांचे वेळापत्रक देखील जाहिर करण्यात आले आहे.

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एमएमएमओसीएल) नवरात्रोत्सवादरम्यान मेट्रो ट्रेन सेवेच्या वाढीव फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष, एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे यांनी हा निर्णय जाहीर केला. सणाच्यासुदीच्या काळात वाढलेल्या मागणीची पूर्तता करण्यासाठी वाहतूक सेवेची वेळ वाढविणे किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी अधोरेखित केले.

नवरात्रोत्सवादरम्यान रात्री उशीरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी ७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अतिरिक्त मेट्रो सेवा पुरविण्यात येईल. या कालावधीत दररोज १२ अतिरिक्त मेट्रो सेवा चालविण्यात येतील आणि दोन मेट्रो सेवांमध्ये १५ मिनिटांचा वेळ असेल. यामुळे या उत्सवात सहभागी होऊन मध्यरात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवासाचा लाभ घेता येईल.

या निर्णयाबाबत महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, "नवरात्रोत्सव लोकांना एकत्र आणतो आणि सर्व भाविकांना व नागरिकांना कार्यक्षम आणि सुरक्षित वाहतूक प्रदान करणे आमची जबाबदारी आहे. मेट्रो ट्रेनच्या सेवा वाढवून आम्ही प्रवाशांना उत्सवादरम्यान रात्री उशीरा होणाऱ्या प्रवासासाठी सोयीस्कर आणि आरामदायक वाहतूक पर्याय प्रदान करीत आहोत."

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक, रुबल अग्रवाल यांनी पुढे सांगितले, "आमच्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, आणि नवरात्रोत्सवादरम्यान ट्रेनच्या सेवा वाढवण्याचा निर्णय प्रवासी अनुभव सुधारण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या अतिरिक्त मेट्रोसेवांमुळे उत्सवात सहभागी होणाऱ्यांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवास सुनिश्चित होईल."

वाढीव मेट्रो सेवांचे वेळापत्रक:

२३:०० नंतर नियोजित वाढीव मेट्रो सेवा खालीलप्रमाणे आहेत:

अंधेरी (पश्चिम) ते गुंदवली:

२३:१५ - ००:२४

२३:३० - ००:३९

२३:४५ - ००:५४

००:०० - ०१:०९

००:१५ - ०१:२४

००:३० - ०१:३९

गुंदवली ते अंधेरी (पश्चिम):

२३:१५ - ००:२४

२३:३० - ००:३९

२३:४५ - ००:५४

००:०० - ०१:०९

००:१५ - ०१:२४

००:३० - ०१:३९

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आपल्या प्रवाशांना सर्वोच्च दर्जाच्या सेवा पुरविण्यासाठी कटिबद्ध आहे. वाढीव वेळा आणि अतिरिक्त मेट्रो सेवांमुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : उमरगा शहरात झळकले 64 हजार महिला बेपत्ता असल्याचे बॅनर

IND vs BAN: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! कानपूर कसोटी जिंकताच मोडले हे मोठे रेकॉर्ड

Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरण : शाळेच्या अध्यक्ष-सचिवांना मोठा झटका; कोर्टात नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

Dombivali News : खराब रस्त्यांमुळे महिलेचा मृत्यू; डोंबिवलीतील घटना, वयोवृद्धाचाही हात फ्रॅक्चर

CM Shinde: लाडक्या बहिणींनो! सावत्र भावांपासून सावध रहा; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT