मोह भोवला! परदेशी चलनाच्या नावाखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सागर आव्हाड
मुंबई/पुणे

मोह भोवला! परदेशी चलनाच्या नावाखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बिबेवाडी पोलिसांकडून या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

सागर आव्हाड साम टीव्ही पुणे

पुणे - झटपट श्रीमंत होण्याचा मोह तुम्हाला घातक ठरू शकतो परदेशी चलनाच्या नावाखाली तुमची फसवणूक Fraud होऊ शकते. पुण्यातही Pune परदेशी चलनाच्या नावाखाली अनेकांना गंडा घालण्यात आला आहे. बिबेवाडी पोलिसांकडून Police या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

यूएई'चे दिरहम चलन स्वस्तामध्ये देण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने आतापर्यंत ८ ते १० लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. देशातील विविध शहरांत या टोळीने अनेक गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील पहा -

पाखी सुबान मलिक , बाबू फुलमिया मुल्ला, उस्मान मुतलिफ अली, महंमद उबईदुल्ला मुदसेर शेख ,महंमद कामरान खान, रिदोई रहीम खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी देशातीली विविध भागांतील राहणारे आहेत. त्यांचा महाजन नावाचा एक म्होरक्या असून, तोच गरीब-गरजू लोकांना सोबत घेऊन अशा पद्धतीने या टोळीने गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे.

अलीकडे शहरात त्यांनी यूएईचे दिरहम चलन देण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्यास सुरुवात केली होती. बिबवेवाडी येथील व्यवसायिकाला कमी किमतीत दिरहम देण्याच्या आमिषाने तीन लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या गुन्ह्यात बिबवेवाडी पोलीस या टोळीच्या मागावर होते. त्या वेळी ही टोळी शहरातील एका व्यक्तीला फसविणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. या टोळीने आठ ते दहा गुन्हे केल्याचे समोर आले असून, त्यापैकी लोणीकंद येथे एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी करायचे फसवणूक

टोळीचा म्होरक्या महाजन साथीदारांची निवड करून, त्यांना एक मोबाइल Mobile व सीमकार्ड Sim card देत असे, तसेच त्यांना एक दिरहम देऊन ग्राहक शोधायला पाठवत असे. कार असलेल्या व्यक्ती जवळ जाऊन आरोपी त्यांना दिरहम चलन दाखवत असे. संबंधित व्यक्ती आमिषाला बळी पडून, भारतीय चलनात पैसे देत असे. मात्र आरोपी त्याला साबणाच्या वडीला कागद गुंडाळून तो रूमालमध्ये बांधून देण्यात येत होते. त्यानंतर आरोपी आपले सीमकार्ड व मोबाइल बंद करीत असत.

गुन्ह्यात मिळालेल्या पैशांपैकी टोळीच्या म्होरक्याला ३०%, ग्राहक शोधणाऱ्याला ३०%, साबणाची वडी देण्यासाठी गेलेल्याला व्यक्तीला १५% टक्के आणि लक्ष ठेवणाऱ्यांना १०% अशी पैशाची वाटणी केली जात होती. शहरात या टोळीने अनेकांना फसविल्याचे समोर येत आहे. पण, काही जणांनी तक्रारी केल्या नाहीत. नागरिकांची अशा पद्धतीने फसवणूक झाली असेल, तर त्यांनी पोलिसांत तक्रार करावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Four Rajyog On 2026: पुढच्या वर्षीच्या सुरुवातीलाच बनणार 4 राजयोग; 'या' ३ राशींचं नशीब रातोरात चमकणार

Maharashtra Live News Update: नामांकनासाठी आज शेवटचा दिवस, रॅलीसह शक्ती प्रदर्शनाची तयारी

Local Body Election : अजित पवारांना एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का, गोगावलेंनी रायगडचे राजकारण फिरवले

Blood cancer: ब्लड कॅन्सर झाला की शरीरात होऊ लागतात हे बदल

Praful Patel: 'कुणी स्वतःला बाहुबली समजू नका'; बिहारच्या निकालानंतर पटेलांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT