Pune Blast News Saamtv
मुंबई/पुणे

Pune Blast News: पुण्यात इलेक्ट्रिक दुकानात स्फोट! ATS कडून तपास सुरु; काय आहे प्रकरण?

स्फोट इतके मोठे होते की, दुकानांचे शटर, भिंतीचे कॉलम, दगड, विटा व इतर साहित्य पलीकडील रस्त्यावर पडले होते.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune News: पुणे शहरातील सहकारनगरमध्ये शनिवारी रात्री इलेक्ट्रॅानिक्स दुकानात एक स्फोट झाल्याची घटना समोर आली होती. यामध्ये दोन जण जखमीही झाले असून उपचाराकरीता त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, या स्फोटाबद्दल आता मोठी माहिती समोर येत असून स्फोटांत झालेलं नुकसान पाहता संशय आल्याने एटीएसने या बाबतचा तपास सुरू केल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, सहकारनगर परिसरात सोमवारी पहाटे तीन वाजता टीव्हीचा स्फ़ोट होऊन एक जण गंभीर जखमी झाला होता. स्फोट इतके मोठे होते की, दुकानांचे शटर, भिंतीचे कॉलम, दगड, विटा व इतर साहित्य पलीकडील रस्त्यावर पडले होते. मात्र स्फोटांत झालेल नुकसान पाहता तपास यंत्रणांना संशय आल्याने एटीएसचा तपास सुरू केला आहे.

याशिवाय घटनास्थळावरील तीन दुकानांध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली होती. या भीषण आगीत दोन नागरिक जखमी झाल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. टीव्हीच्या स्फोटमध्ये इतके नुकसान कसे होऊ शकते? याबाबत तपास यंत्रणांना संशय आला. ज्यामुळे एटीएसकडून (ATS) सविस्तर तपास सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, स्फोट झालेल्या सहकार नगरमध्ये होम अप्लायन्स, किचन अप्लायन्स व आणि मोबाईल शॉपी अशी दुकाने आहेत. घटनास्थळी गॅस शेगडी, चिमण्या, गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, फ्रिज, वॉशिंग मशीन, टिव्ही, मोबाईल, बॅटरी अशा अनेक प्रकारच्या वस्तू होत्या, अशीही माहिती समोर आली आहे. (Pune News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Health : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरांटो प्रकल्पाविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

Monday Horoscope : या 7 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; वाचा सोमवारचं राशीभविष्य

CM थलपती विजय यांच्यानंतर आणखी एक अभिनेता येणार राजकारणात; चर्चांना उधाण

Makeup Tips: इंडियन स्किन टोननुसार मेकअप कसा निवडावा? फाउंडेशनपासून ब्लशपर्यंत जाणून घ्या ७ सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT