Metro Monorail News Saam Tv
मुंबई/पुणे

Explainer: मोनो आणि मेट्रो तोट्यात कशी गेली? जाणून घ्या...

Metro Monorail News: मोनो आणि मेट्रो तोट्यात कशी गेली? जाणून घ्या...

Satish Kengar

Metro Monorail News: मुंबई व जवळपासच्या परिसरात प्रवास करताना अधिक जलद व सुखकर प्रवासासाठी मोनो आणि मेट्रोची सुरुवात करण्यात आली होती. शहरातील वाहतूक कोंडीने त्रस्त नागरिकांना कमीवेळात हवं त्या ठिकाणी पोहोचता यावं, म्हणून बस, रेल्वेसह या पर्यायी वाहतुकीची सुरुवात करण्यात आली. मात्र सध्याची परिस्थिती पाहता मोनो आणि मेट्रो या दोन्ही तोट्यात सुरू आहेत. या दोन्ही वाहतूक तोट्यात कशा तोट्यात गेल्या? या मागचं नेमकं कारण काय? याच प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.

एका अहवालानुसार, मोनो रेलला चालू आर्थिक वर्षात 2023-2024 मध्ये 529 कोटींचा घाटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. नवीन रेकची खरेदी, महालक्ष्मी आणि जेकब्स सर्कलला जोडणारा ट्रॅव्हेटर बांधण्याचा खर्च यामुळे तोटा वाढला आहे. एमएमआरडीएने 10 रेकसाठी ऑर्डर देखील दिल्या आहेत. ज्यासाठी 590 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

एमएमआरडीएच्या एका माजी अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, मोनो रेल्वेचे नुकसान कमी करणे अवघड आहे. कारण हा प्रकल्प उपभारात असताना योग्य योजना केली नसून याचा याचा मार्गही चुकीच्या पद्धतीने निवडण्यात आला आहे. त्यांनी राज्य सरकारला नुकसानीत सुरू असेल मोनो बंद करण्याची विनंतीही केली आहे. (Latest Marathi News)

म्हणून मोनो तोट्यात...

मार्च 2019 मध्ये चा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोनो रेल्वे नेटवर्कद्वारे दररोज 1 लाख लोक प्रवास करतील असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र प्रत्येक्षात तसं काही झालं नाही. कोरोनापूर्व काळात यातून ददरोज 18,000 प्रवासी प्रवास करत होते. तर कोरोनानंतर म्हणजेच 2023 मध्ये यातून ददरोज 12,000 प्रवासी प्रवास करत आहेत. यामुळे ही रेल सुरू ठेवण्यासाठी जो खर्च येत आहे, तोही पूर्णपणे निघत आहे की नाही याबाबत शंका आहे.

मेट्रोचा खर्च 322 कोटी कमावले फक्त 41 कोटी

एका वृत्तानुसार, गुंदवली-दहिसर-अंधेरी पश्चिमेचा समावेश असलेल्या मेट्रो 2A आणि 7 मध्ये दररोज 2.3 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. या दोन्ही लाइनवर सुरू असलेल्या मेट्रोचेही दरमहा सुमारे 23 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. मेट्रोने मागील आर्थिक वर्षात 322 कोटी रुपयांच्या खर्चाच्या तुलनेत फक्त 41 कोटी रुपये कमावले होते.

एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्हाला मेट्रोचे भविष्य अंधारात आहे, असं वाटत नाही. आम्हाला आशा आहे की किमान ऑपरेशनल खर्च तरी यातून निघेल."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: बापरे बाप... चक्क काकूंनी सापांना कपड्यांसारखे धु धु धुतले; व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल...

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

SCROLL FOR NEXT