BMC election result  Saam tv
मुंबई/पुणे

Explainer : मुंबईतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे धुंरधर कोण? यशामागे नेमकी काय होती रणनीती? वाचा

BMC Election Result Explainer : मुंबईत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांची खेळी हटके ठरली आहे.

Saam Tv

मुंबई महापालिकेवर भाजपचा डंका

महापालिका विजयासाठी दोन नेत्यांची रणनीती गेमचेंजर

मुख्यमंत्री फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांचा प्लान यशस्वी

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक यश मिळवलं आहे. राज्यभरात कमाल करणाऱ्या भाजपची नेमकी काय रणनीती होती? त्यांच्या विजयाचे शिल्पकार कोण? याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपच्या विजयामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्लानिंग यशस्वी ठरल्याचं पाहायला मिळालं.

भाजपचा 'चाणक्य' पॅटर्न निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूक्ष्म नियोजन केल्याचे दिसून आलं. मुख्यमंत्री फडणवीसांना या मोहिमेत रवींद्र चव्हाण यांची साथ लाभली. मुख्यमंत्री फडणवीसांनी आखलेली रणनीती प्रत्यक्ष जमिनीवर राबवण्याची जबाबदारी चव्हाण यांनी पेलल्याचे दिसून आलं. मुंबईसह २९ महापालिकेवर भाजपला मिळालेले यश हे या दोघांमधील उत्तम समन्वयाचा परिणाम असल्याचे बोललं जात आहे.

रणनीती कशी राखली?

सूक्ष्म नियोजन : प्रत्येक मतदारसंघातील समीकरणे, स्थानिक प्रश्न आणि कार्यकर्त्यांचे जाळे यावर या जोडीने विशेष लक्ष दिल्याचे दिसून आलं.

बंडखोरी रोखली : तिकीट वाटपानंतर उद्भवलेली नाराजी दूर करण्यात दोन्ही नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

समन्वयाची जोड : देवेंद्र फडणवीसांनी राज्य पातळीवर प्रचाराची धुरा सांभाळल्याचे दिसून आलं. तर रवींद्र चव्हाण यांनी संघटनात्मक बांधणी आणि बुथ पातळीवरील नियोजनावर भर पाहायला मिळाले.

मुंबईवर विशेष लक्ष : मुंबई महापालिका आणि विधानसभा अशा दोन्ही दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मुंबईतील जागांसाठी चव्हाणांनी रणनीती आखली होती.त्याचा फायदा भाजपला झाला.

या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने मुसंडी मारली. विशेषतः मुंबईत ठाकरे गटाच्या प्रभावाला रोखण्यासाठी फडणवीस-चव्हाण जोडीने 'मराठी कार्ड' आणि 'विकास' या दोन्ही मुद्द्यांची सांगड घातल्याचे दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जेलमधून गुंड लढले, निवडणूक जिंकले; गुंडांच्या गुंडगिरीला जनतेचा कौल

MMR मध्ये बविआनं रोखला भाजपचा रथ; वसई- विरारमध्ये बविआ अभेद्य

BMC Election: मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर; काँग्रेस, शिवसेना, RPIनंतर भाजपला संधी

मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर; तुमच्या वॉर्डाचा नगरसेवक कोण? जाणून घ्या एका क्लिकवर

Explainer : मुंबईत घराणेशाहीला धक्का, तरी काहींना कौल; मुंबईकरांनी निकालातून काय संदेश दिला?

SCROLL FOR NEXT