कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ Saam Tv
मुंबई/पुणे

कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ

कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपले पालक गमावलेले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - कोरोना या आजारामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अशी माहिती महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपले पालक गमावलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे इयत्ता दहावी आणि बारावी शुल्क भरण्यामध्ये अडचणी येऊ शकतात आणि विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

हे देखील पहा -

त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील अशा विद्यार्थ्यांचे हित लक्षत घेऊन महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२१-२२ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : जेवण करताना पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले की वाईट? किती पाणी प्यावे? जाणून घ्या

राहुल गांधींना मोठा धक्का! निवडणूक आयोगाविरोधातील याचिकेत तब्बल १४ त्रुटी; सुनावणी लांबणीवर?

Maharashtra News Live Update : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार गटाची सत्ता

Fact Check : एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची बदली? स्वतःच समोर येऊन सांगितलं सत्य

Maharashtra Weather : कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा; हवामान विभागाकडून 'येलो अलर्ट' जारी

SCROLL FOR NEXT