Sharad Pawar Latest Marathi News, Sharad Pawar News Saam TV
मुंबई/पुणे

प्रत्येकानं आपल्या धार्मिक भावना स्वतः पर्यंत मर्यादित ठेवाव्या- पवार

तुमचा धार्मिक कार्यक्रम आमच्या दाराशी कशासाठी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: सत्ता गेल्यावर लोक काही अस्वस्थ होतात. सगळेच माझ्यासारखे नसतात. निवडणुकांअगोदर काही लोकांनी 'मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार', अशा घोषणा दिले होते. यामुळे ते सध्या अस्वस्थ होत असणार, तर मी त्यांना दोष देणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना चिमटा काढला आहे. यावेळी शरद पवार यांना भाजप (BJP) नेत्यांच्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीविषयी विचारणा करण्यात आली आहे. (Sharad Pawar Latest Marathi News)

हे देखील पाहा-

यावेळी शरद पवार यांनी म्हणाले की, सत्ता गेल्यावर लोक अस्वस्थ होत असतात. सगळेच माझ्यासारखे नसतात. माझी सत्ता किती वेळेस गेली आहे. १९८० साली माझे सरकार बरखास्त झाले होते. रात्री साडेबारा वाजता मुख्य सचिवांनी मला ही बातमी दिली. यानंतर मी ३-४ लोकांना बोलावून घरामधील सामान आवरलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो. सरकारची गादी सोडली. यादिवशी मुंबईत इंग्लंड आणि भारत यांची क्रिकेट मॅच होती. ती मॅच बघण्यासाठी मी सकाळी १० वाजता वानखेडे स्टेडिअमवर गेलो आणि दिवसभर मॅच बघण्याचा आनंद लुटला आहे.

सत्ता येते आणि जाते. यामुळे आपण इतके अस्वस्थ होण्याची गरज नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. यावेळी शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील जोरदार चिमटा काढला आहे. हल्ली सत्ता गेल्याने लोक खूप अस्वस्थ होत आहेत. मी त्यांना दोष देणार नाही. कारण निवडणुका होण्याअगोदरच 'मी येणार, मी येणार', अशा घोषणा त्यांनी दिल्या होत्या. पण तसे घडू शकले नाही. यामुळे ते अस्वस्थ असावेत. आपण अपेक्षा करूयात की, आमच्या स्नेह्यांना या सगळ्या परिस्थितीतुन काय निर्माण होते, हे लक्षात येणार आणि इथे योग्य वातावरण निर्माण करण्यास त्यांचे सहकार्य मिळणार आहे, असे शरद पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

Early Morning Dreams: सकाळी पडणारे स्वप्न खरंच पूर्ण होतात का?

SCROLL FOR NEXT