Aaditya Thackeray On Shinde Government saam tv
मुंबई/पुणे

Aaditya Thackeray: '3 महिने झाले, मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्ग तयार असूनही उद्घाटन का नाही?', आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल

Aaditya Thackeray On Shinde Government: ''मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्ग तयार होऊन तीन महिने झाले आहेत, तरीही अद्याप याचं उद्घाटन का केलं नाही'', असा सवाल आदित्य ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे.

Satish Kengar

Aaditya Thackeray On Mumbai Trans Harbour Link:

मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. ''मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्ग तयार होऊन तीन महिने झाले आहेत, तरीही अद्याप याचं उद्घाटन का केलं नाही'', असा सवाल आदित्य ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे. त्यांनी ट्वीट करत हा प्रश्न विचारला आहे.

याआधी डीलाईल रोड ब्रिजवरूनही आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलं होतं. त्यानंतर याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. आता मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा प्रश्न उपस्थित केला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ट्विटमध्ये काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, ''महाराष्ट्राला पुन्हा एकदा फसवलं. आज मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या उद्धाटनाची तारिख असेल, असं माध्यमांना सांगण्यात आलं होतं. पण आता ते उद्घाटन पुन्हा पुढच्या वर्षावर ढकलण्यात आलं आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं 3 महिने तयार असूनही नाही.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''8 महिने तयार असूनही दिघा रेल्वे स्टेशनचं उद्घाटन नाही. कोणासाठी नेमकं थांबवलं आहे हे सगळं? सूरतचं डायमंड बोर्ज मात्र लगेच जगाला दाखवलं. वेदांता फॉक्सकॉन, एयरबस टाटा, डायमंड बोर्ज, मेडिकल डिव्हाईस पार्क, सगळं तिथे नेलं.''

आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी पुढे लिहिलं आहे की, ''हा आपल्या महाराष्ट्राचा अपमान किती दिवस सहन करायचा? 2024 मध्ये तुम्ही ठरवा, आपल्या राज्याचं भविष्य आपण ठरवायचं की, शेजारच्या राज्याने.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Pune News: निलेश गायवळचा जामीन अर्ज रद्द करा, पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात अर्ज|VIDEO

Mobile Tips: तुमचा फोन इतक्या लवकर खराब का होतो? जाणून घ्या कारणे आणि टिप्स

Maharashtra Live News Update : कोंढव्यात पोलिसांसोबत झालेल्या झटापटीनंतर ड्रग्स पेडलरचा मृत्यू

'लग्नापूर्वी मी कुणासोबत शरीरसंबंध आणि कुणासोबत नाही..' बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीचं स्टेटमेंट चर्चेत

SCROLL FOR NEXT