Eknath Shinde Helicopter Emergency Landing
Eknath Shinde Helicopter Emergency Landing Saam Tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde Helicopter Emergency Landing : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

Satish Kengar

CM Eknath Shinde Helicopter Emergency Landing : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग केल्याची बातमी समोर येत आहे. शिंदे यांचे हेलिकॅाप्टरचे राजभवन हेलिपॅडवर इमर्जन्सी लॅंडिग करण्यात आली आहे. हेलिकॅाप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही इमर्जन्सी लँडिंग केल्याचं समजतं आहे.

मिळालेल्या माहितेनुसार, इमर्जन्सी लँडिंगवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि रोहियो मंत्री संदिपान भूमरे हेलिकॅप्टरमध्ये उपस्थित होते. हेलिकॅाप्टरच्या एसीमध्ये बिघाड झाल्यामुळे बंद पडला आणि त्यामुळे हेलिकॅाप्टर पुन्हा राजभवनच्या हेलिपॅडवर उतरविण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज नियोजीत सातारा पाटन दौरा आहे. त्यासाठी हेलिकॅाप्टरने राजभवन येथील हेलिपॅडवरून उड्डाण केले होते. (Latest Marathi News)

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सर्वोच्य न्यायालयातील लढाई जींकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज पहिलाच ग्रामिण महाराष्ट्रातील दौरा आहे. त्यामुळे आज स्थानिक पाटणवासीय शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जंगी स्वागत करणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाटण येथील हेलिपॅडवर आगमन झाल्यावर मुख्य कार्यक्रम स्थळी जाई पर्यंत त्यांच्यावर अनेक जेसीबी मशिनवरून फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक शिवसैनिकांनी जल्लोषाची जोरदार तयारी केलीय.Karnataka Elections Results 2023: मोठी बातमी! कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा पराभव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Strong Bones : हाडांच्या मजबूतीसाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा; सांधे दुखी होईल छुमंतर

Shantigiri Maharaj Nashik News | नाशिकमधून गावितांनी घेतली माघार, शांतिगिरी अजूनही ठाम

ED Raid: मंत्र्याच्या PA कडे सापडलं कोट्यवधींचं घबाड; पैशांचा नुसता ढीग, नोटा मोजून ईडी अधिकारीही थकले

Today's Marathi News Live : रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रशासन मतदानासाठी सज्ज

Mumbai Water Lake Level : मुंबईकरांवर पाणीकपातीचं सावट; शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये सध्या किती पाणीसाठा?

SCROLL FOR NEXT