Tesla in Pune Saam TV
मुंबई/पुणे

Tesla in Pune : टेस्लाचं ठरलं! पुण्यातील विमाननगर भागात असणार कंपनीचं भलंमोठंं ऑफिस

Elon Musk News : टेस्ला कंपनी आता पुण्यातील पंचशील बिझनेस पार्क येथे आपल्या कार्यालयासाठी जागा भाड्याने घेतली आहे.

प्रविण वाकचौरे

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असताना टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर टेस्ला लवकरच भारतात आपल्या प्रकल्प उभारणीस सुरुवात करेल, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार आता टेस्ला पुण्यातील विमाननगर भागात दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

टेस्ला भारतात आपला व्यवसाय विस्तारण्यासाठी सज्ज आहे. टेस्ला कंपनी आता पुण्यातील पंचशील बिझनेस पार्क येथे आपल्या कार्यालयासाठी जागा भाड्याने घेतली आहे. टेस्ला अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भारतातील इलेक्ट्रिक कारच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योगमंत्र्यांची भेट घेतली होती.  (Latest Marathi News)

टेस्ला कंपनीने पंचशील बिझनेस पार्कमधील बी विंगच्या पहिल्या मजल्यावर 5580 चौरस फूट कार्यालयाची जागा घेतली आहे. टेबलस्पेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडसोबत हा करार करण्यात आला आहे. त्याचे भाडे 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होईल आणि दोन्ही कंपन्यांनी दरवर्षी 5 टक्के वाढीसह 36 महिन्यांच्या लॉक-इन कालावधीवर सहमती दर्शवली आहे. या कंपनीची इच्छा असल्यास ती आणखी पाच वर्षांसाठी लीज वाढवू शकते.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, टेस्ला 60 महिन्यांसाठी जागा भाड्याने देण्यासाठी 11.65 लाख रुपये मासिक भाडे आणि 34.95 लाख रुपये डिपॉझिट भरणार आहे. ही जागा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Tourism : गोव्याहून सुंदर ठाण्यातील 'हा' समुद्रकिनारा, एकदा गेलात तर परत यावं वाटणार नाही

Pune News: १०० फूट उंच तेजस्वी प्रतिकृती! पुण्यातील दगडूशेठ मंडळाकडून यंदा केरळच्या मंदिराचा देखावा|VIDEO

EPFO खाते असणाऱ्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपये मिळणार? पण कसे? जाणून घ्या...

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे यांचे संगमनेरात जल्लोष स्वागत...

Monday Horoscope : स्पर्धात्मक वातावरणात प्रगती होईल, ५ राशींना मिळेल यश; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT