Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : नवीकोरी स्कूटर महिन्यात खराब, पट्ट्याने शोरूमला नेली अन् पेटवून दिली, पुण्यातील घटना

Pune News : पुण्यातील कोंढवा येथे एका संतप्त ग्राहकाने अवघ्या महिन्यात बिघडलेल्या ई-स्कूटरवर संतापून ती थेट सर्व्हिस सेंटरमध्ये पेटवली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • महिन्याभरातच ई-स्कूटर बिघडल्यामुळे तरुणाने ती पेटवून दिली.

  • कंपनीकडून वेळ मारून नेल्यामुळे संताप अनावर.

  • घटना पुण्यातील कोंढवा येथील साई सर्व्हिस सेंटरमध्ये घडली.

  • पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

राग अनावर झाला नाही तर काय घडू शकतं हे पुण्यात घडलेल्या घटनेतून समोर आल आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात एका तरुणाचा ई-स्कूटरबाबतचा संताप टोकाला पोहोचला. अवघ्या महिन्याभरात खराब झालेली इलेक्ट्रिक स्कूटर वारंवार तक्रारी करूनही दुरुस्त न झाल्यामुळे संबंधित तरुणाने थेट सर्व्हिस सेंटरमध्ये स्कूटर पेटवून दिली. ही घटना सोमजी चौकातील साई सर्व्हिस सेंटरमध्ये घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिरायु चंद्रकांत घोणे यांनी त्यांच्या वडिलांसाठी ई-स्कूटर घेतली होती. मात्र काही दिवसांतच ती बंद पडली आणि वारंवार फॉलोअप करूनही कंपनीकडून कोणतीच ठोस मदत मिळाली नाही. २१ जुलै रोजी त्यांना कळवण्यात आलं की, स्कूटरची मोटार खराब झाली असून ती मोफत बदलली जाईल. मात्र ती कधी मिळेल, हे न सांगता वेळ मारून नेण्यात आला.

घोणे हे २३ जुलै रोजी पुन्हा सर्व्हिस सेंटरमध्ये गेले आणि उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांशी वाद घातला. नंतर थोड्याच वेळात ते मोटारसायकलमधून पेट्रोलची बाटली घेऊन आले आणि आपल्या स्कूटरवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिलं. या घटनेत स्कूटर पूर्णतः जळून खाक झाली असून साई सर्व्हिस सेंटरचे व्यवस्थापक जालिंदर विठ्ठल नेवसे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात घोणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

ही घटना कुठे घडली?

पुण्याच्या कोंढवा भागातील साई सर्व्हिस सेंटरमध्ये.

स्कूटर पेटविण्याचे कारण काय होते?

वारंवार तक्रारी करूनही स्कूटर न दुरुस्त केल्यामुळे संतप्त ग्राहकाने हा निर्णय घेतला.

स्कूटरचा मालक कोण आहे?

चिरायु चंद्रकांत घोणे, जे वाहन खरेदी-विक्री सल्लागार म्हणून काम करतात.

काय कारवाई झाली?

कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT