Uddhav Thackeray Vs Eknath Shinde  Saam Tv
मुंबई/पुणे

Shivsena Political Crisis : शिंदे गट उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत

शिवाजी पार्क उद्धव ठाकरे यांना मिळू नये यासाठी शिंदे गटाची खेळी

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक, साम टिव्ही

मुंबई : एकीकडे शिवसेना नेमकी कुणाची हा वाद सुप्रीम कोर्टात सुरू असतानाच, दुसरीकडे शिवसेनेच्या दसरा मेळ्यावरून पुन्हा शिंदे आणि ठाकरे (Uddhav Thackeray) असा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. कारण, शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याबाबत शिंदे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्कवर कुणालाही परवानगी देऊ नका, अशी मागणी शिंदे Eknath Shinde) गट करणार असल्याची माहिती आहे. (Uddhav Thackeray vs Eknath Shinde)

शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षी शिवसेनेकडून दसरा मेळावा घेण्यात येतो. या मेळाव्याला राज्यभरातून हजारो शिवसैनिक येत असतात. यावर्षी सुद्धा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेकडून अर्ज करण्यात आला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून सुद्धा दसरा मेळाव्यासाठी अर्ज करण्यात आला आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. अशातच, दसरा मेळाव्यासाठी आधी ज्याने अर्ज केला त्याला परवानगी देण्याची भूमिका महापालिका घेऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडून आधी अर्ज करण्यात आलाय. त्यामुळे त्यांना परवानगी मिळू शकते. (Shivsena Political Crisis)

दरम्यान, शिवसेनेला परवानगी मिळाल्यानंतर शिंदे गट आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क कोणालाच देऊ नका ही आक्रमक भूमिका शिंदे गट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवाजी पार्क मैदान फ्रिज होण्याची शक्यता आहे.

दसरा मेळावा शिवसेनेसाठी इतका महत्त्वाचा का?

महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा आणि वाटचाल ठरवण्यात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा निश्चितपणे उल्लेख करता येईल. दरवर्षी दसरा मेळाव्यात स्व बाळासाहेब ठाकरे यांचे झंझावती भाषण असायचे. बाळासाहेब ठाकरे यांची प्रत्येक सभा ही विरोधकांची पिसं काढणारी आणि आक्रमक असायची. मात्र, बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचे स्थान हे काही वेगळेच असायचे.

त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी रावण दहनानंतर बाळासाहेब ठाकरे यांना ऐकण्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान गर्दीने तुडूंब भरलेले असायचे. यावेळी शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द ना शब्द कानात साठवून ठेवायचे. दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी दिलेला आदेश हा शिवसैनिकांसाठी कायमच प्रमाण होता.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT