Eknath Shinde  Saam Tv
मुंबई/पुणे

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट; म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना नोटिसा बजावल्या आहेत. तर पुढील सुनावणी ११ तारखेला होणार आहे. याचदरम्यान, बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडी सरकारने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना नोटिसा बजावल्या आहेत. तर पुढील सुनावणी ११ तारखेला होणार आहे. याचनंतर, बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या हिंदुत्वाचा विजय आणि धर्मवीर आंनद दिघे यांच्या विचारांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ( Eknath Shinde Latest News )

सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडी सरकारने केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी ११ जुलै २०२२ रोजी होणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांसह बंडखोरांना निदान ११ जुलैपर्यंत कोणतीही कायदेशीर घडामोडी करणं शक्य नाही. शिवाय ११ जुलैपर्यंत बंडखोर आमदारांनाही अपात्रही ठरवता येणार नाही. ज्या आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली, त्यांना उत्तर देण्यासाठी ११ जुलैच्या संध्याकाळपर्यंत वेळ सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या सुनावणीनंतर बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे म्हणाले, 'हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय'. शिंदे यांच्या नव्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे.

दरम्यान, राज्याच्या राजकीय घडामोडीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भूमिका महत्वाची होती. मात्र,सर्वोच्च न्यायालयाने उपाध्यक्षांनी बंडखोरांना पाठवलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जुलै २०२२ रोजी ढकलली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर बंडखोर आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीपूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार? मुरुगन यांच्यानंतर आणखी चार मंत्री राजीनामा देणार, चर्चांना उधाण

Leg Pain After Garba : नवरात्रीत गरबा खेळून पाय दुखले? 'या' सोप्या घरगुती उपायांनी २ मिनिटांत मिळेल आराम

Maharashtra News Live Update : Mumbai: नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात बिबट्यांची दहशत

Amla and aloe vera juice: सकाळी सकाळी रिकाम्या पोटी आवळा आणि कोरफडीचा ज्यूस प्यायल्यास काय होईल? वाचा

बहीण भावाच्या नात्याला काळिमा! वारंवार अत्याचार केल्याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

SCROLL FOR NEXT